misuse of money sakal
जळगाव

Jalgaon News : किराणा दुकानदारास नोकरानेच लावले ‘चंदन’

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीतील समर्थ कृपा किराणा दुकानात कामाला असलेल्या नोकराने मागील माहिन्यात चक्क ५ लाख ६९ हजार ५३० रुपयांचा किराणा माल परस्पर विकून पैशांचा गैरव्यवहार केला. गुन्हा घडल्यापासून फरार संशयिताला गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. (servant misuse money by Mutually selling groceries worth Rs 5 lakh jalgaon news)

रामेश्वर कॉलनीतील जावई गल्लीत नंदकिशोर भागवत शिंदे (वय ४३) यांचे श्री समर्थ कृपा किराणा दुकान आहे. दुकानात विशाल शरद पाटील कामाला होता. ५ फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान विशाल याने वेळावेळी किराणा दुकानातून तब्बल पाच लाख ६९ हजार ५३० रुपयांचा किराणा चोरून नेला व तो परस्पर विक्री केला.

ही बाब लक्षात आल्यावर मालक भागवत शिंदे यांनी १४ मार्चला दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात विशाल पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच संशयित फरारी झाला हेाता.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांना मिळालेल्या माहितीवरून इम्रान सय्यद, साईनाथ मुंडे, योगेश बारी, सुधीर साळवे यांनी विशाल पाटील याला पुण्यात अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी ३० हजार रुपयांची रोकड जप्त केली. त्यास जिल्‍हा न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश जे. एस. केळकर यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT