Road construction
Road construction sakal
जळगाव

Jalgaon News : रस्ते कामात मलनिस्सारणचे चेंबर्सही बुजविले; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील काही भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी असलेले मलनिस्सारण योजनेचे चेंबर्सही बुजविले जात आहे.

आता हे चेंबर्सच बाहेर काढण्यासाठी पुन्हा रस्ते खोदावे लागणार असून, त्याचा खर्च पुन्हा महापालिकेला करावा लागणार आहे. (Sewage chambers were also extinguished during road works jalgaon news)

शहरातील विविध भागांतील रस्त्याचे कामे सुरू आहेत. काही भागात रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे, तर काही भागात कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. रस्त्यांची कामे करताना अमृत योजनेंतर्गत करण्यात आलेले मलनिस्सारण योजनेचे चेबर्सं पाहून कामे करावीत, असे आदेश आहेत.

काम सुरू असताना, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असण्याची गरज आहे. शिवाय मक्तेदारांना सूचना देणे सक्तीचे करण्यात आले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मात्र, हे सर्व नियम डावलून शहरातील विविध कॉलन्या व परिसरात सुरू असलेल्या रस्ते कामात चेंबर्स बुजविले आहेत. त्यावर थेट डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे काही भागांत नागरिकांना मक्तेदारांना माहिती दिली असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून चेंबर्स बुजविले आहेत. त्यामुळे आता हे चेंबर्स उघडण्यासाठी पुन्हा महापालिकेला खर्च करावा लागणार असून, पुन्हा रस्ते खोदावे लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur Lok Sabha: '500 रुपये एका मताची किंमत'; अमोल कोल्हेंनी व्हिडिओ शेअर करत केला मोठा दावा

Mamata Banerjee: ममतांनी सांगितलं NDA अन् INDIAला किती जागा मिळणार; म्हणाल्या, कालच...

Rohit Sharma: फक्त रोहितचाच जलवा! सर्वात मोठ्या स्टेडियमवर टीम इंडियाची T20 जर्सी लाँच, पण हार्दिककडे दुर्लक्ष, पाहा Video

Maharashtra Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 52.63 टक्के मतदान, शिरुर अन् पुण्यात मतदारांचा कमी प्रतिसाद

Mumbai Rain Accident: घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळले, जवळपास 80 गाड्या दबल्या, अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT