team of shendurni nagarpanchayat receiving award from deputy CM Ajit Pawar & environment minister aditya thackeray esakal
जळगाव

जळगाव : ‘माझी वसुंधरा’ अभियानात शेंदुर्णी नगरपंचायत राज्यात दुसरी

मिलींद वानखेडे

शेंदुर्णी (जि. जळगाव) : ‘माझी वसुंधरा’ अभियानात (Majhi Vasundhara Abhiyan) १६५ नगरपंचायतींमधून (Nagar Panchayat) शेंदुर्णीने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) ‘माझी वसुंधरा’ अभियान पुरस्कार सोहळा रविवारी (ता. ५) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या उपस्थित मुंबई येथे झाला. त्यासोबत बक्षीस वितरणही करण्यात आले. (Shendurni Nagar Panchayat got second Rank in state in Majhi Vasundhara Abhiyan Jalgaon News)

या वेळी शेंदुर्णीहून मुख्याधिकारी साजिद पिंजारी, उपनगराध्यक्ष नीलेश थोरात, ज्येष्ठ समाजसेवक अमृत खलसे, नगरसेवक अलिम तडवी, गणेश पाटील, गणेश जोहरे, प्रफुल पाटील, ‘माझी वसुंधरा’प्रमुख लोकेश साळी, विजय धुमाळ यांनी पुरस्कार स्वीकारला.
पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामपंचायत, नगरपंचायत, पालिका व महापालिका अशा स्तरावरील निकाल जाहीर झाला. त्यात शेंदुर्णी नगरपंचायतचा राज्यात दुसरा क्रमांक व जळगाव जिल्ह्यातील एकमेव शेंदुर्णी नगरपंचायतीला पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्काराची रक्कम रुपये दोन कोटी आहे. मागील वर्षीही शेंदुर्णी नगरपंचायतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानात सर्वोत्तम कामगिरी केली होती. या वर्षी स्पर्धेचे निकष बदलून झालेल्या स्पर्धेतही शेंदुर्णी नगरपंचायतीला राज्यात पहिल्या तीन क्रमांकात आपले नाव कोरण्यात यश आले आहे.

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी शेंदुर्णी नगरपंचायतीने केलेल्या कामगिरीबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि ‘माझी वसुंधरा’ अभियान संचालनालय यांच्या वतीने हा पुरस्कार शेंदुर्णी नगरपंचायतीला देण्यात आला. नगरपंचायत गेल्या काही महिन्यांमध्ये स्वच्छता अभियानाच्या बाबतीत घेतलेला पुढाकार व शेंदुर्णी शहरामध्ये केलेले वेगवेगळे बदल यांची दखल घेत या पुरस्कारासाठी शेंदुर्णी नगरपंचायतची निवड करण्यात आली. नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक व आरोग्यविभाग व इतर सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT