esakal
जळगाव

Jalgaon News : चोपडा शेतकी संघाच्या 10 जागा बिनविरोध; निवडणुकीतून शिंदे सेनेची माघार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे सेनेने आघाडी घेतल्यानंतर शेतकी संघातही राष्ट्रवादीच्या विरोधात दंड थोपटतील असे वाटले होते, पण शिंदे सेनेच्या सर्वच उमेदवारांनी शेतकी संघाच्या निवडणुकीत काढता पाय घेतल्याने अखेर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह राष्ट्रीय काँग्रेस एक झाल्याने त्यांच्या १५ पैकी १० जागा बिनविरोध झाल्या आहेत. (Shinde Sena withdrawal from Chopra Farmers Sangh election jalgaon news)

बिनविरोध उमेदवार असे : सर्वसाधारण संस्था मतदारसंघ- या गटात एकूण सात उमेदवार निवडून द्यायचे होते. सातच अर्ज शिल्लक राहिल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. बाळकृष्ण शंकरराव पाटील (भार्डू), चंद्रशेखर भीमराव पाटील (चोपडा), श्यामकांत भागवत पाटील (आडगाव), नारायण शिवराम पाटील (लासूर), ज्ञानेश्वर पुरुषोत्तम पाटील(तावसे बुद्रुक), सचिन ईश्वर धनगर (अंबाडे), ललित सुभाष बागूल (वेळोदा) हे बिनविरोध झाले आहेत.

भटक्या जाती जमाती मतदारसंघातून देविदास हरिश्चंद्र धनगर (वडती) आणि महिला राखीव मतदारसंघातून विजयाबाई पद्माकर पाटील (वढोदा) आणि राजकन्या प्रल्हाद पाटील (लासूर) या बिनविरोध झालेल्या आहेत. तर सर्वसाधारण व्यक्तीसह मतदारसंघात तीन संचालक निवडून द्यायचे होते. त्यात मात्र निवडणूक होणार आहे.

त्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात सुनील डोंगर पाटील (आडगाव), प्रशांत युवराज पाटील (पंचक), समाधान डोंगर पाटील (घाडवेल), सुभाष तुकाराम पाटील (पंचक), भास्कर बाबुराव पाटील (घाडवेल) यांच्यामध्ये लढत होणार आहे. इतर मागासवर्ग मतदार संघातही एक संचालक निवडून द्यायचा होता. तिथेही तीन उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यात हितेंद्र रमेश देशमुख (चोपडा) सुभाष तुकाराम पाटील (पंचक), विजय जानकीराम देशमुख (चोपडा) यांच्यामध्ये निवडणूक होणार आहे. तसेच अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघांमध्ये एक संचालक निवडून द्यायचा होता. या प्रवर्गातही तीन अर्ज शिल्लक राहिल्याने तिथेही निवडणूक होणार आहे. त्यात शालिक वेंकट करंकाळ (चोपडा), लीलाधर मुरलीधर कोळी (कोळंबा), सिद्धार्थ तुकाराम तायडे (चोपडा) यांच्यात लढत होणार आहे.

नाराज गट आले एकत्र

कृषी उत्पन्न बाजार समितीत चुरशीची निवडणूक झाल्यानंतर शेतकी संघातही तसेच होते की काय? असे वातावरण असताना राष्ट्रवादीचे नाराज गट एकत्र आले आणि सोबत काँग्रेसलाही घेतले आणि ते एकत्रितरित्या त्यांचे पॅनल निवडणुकीला सामोरे जाणार होते. शिंदे सेनेच्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला आणि माघार घेतली. त्यामुळे येथील शेतकी संघामध्ये १५ जागांपैकी दहा जागा या बिनविरोध झालेल्या आहेत. तर पाच जागांवर मात्र निवडणूक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT