phule market jalgaon esakal
जळगाव

Jalgaon News : फुले मार्केट की ‘अतिक्रमणाचे बेट’; अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी दुकानदारांवरच

फुले मार्केटमध्ये अतिक्रमण वाढल्यास जबाबदारी आपलीच राहील, त्या ठिकाणी अतिक्रमण हटविणारे कर्मचारी येणार नाहीत. असा अजब आदेश महापालिकेतर्फे दुकानदारांना देण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : फुले मार्केटमध्ये अतिक्रमण वाढल्यास जबाबदारी आपलीच राहील, त्या ठिकाणी अतिक्रमण हटविणारे कर्मचारी येणार नाहीत. असा अजब आदेश महापालिकेतर्फे दुकानदारांना देण्यात आला आहे. त्यामुळे दुकानदार तक्रार करीत नाही, अतिक्रमण हटविणारे कर्मचारी त्या ठिकाणी जात नाही.

त्यामुळे फुले मार्केट आता एक ‘अतिक्रमण धारकांचे बेट झालंय का? असे चित्र आहे. परिणामी, अतिक्रमणधारक बिनधास्त अन् सामान्य नागरिक मात्र धक्के खात जावे लागत आहे. (shopkeepers responsible for removing encroachments in phule market jalgaon municipality statement jalgaon news)

शहरातील मध्यवर्ती फुले मार्केट याठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची कायम गर्दी असते. मात्र त्यारस्त्यावर विक्रेत्यांचे अतिक्रमणही असते. नागरिकांना चालण्यासाठीही जागा नसते. या ठिकाणचे दुकानदारही अतिक्रमणामुळे त्रस्त असतात ते वेळोवेळी महापालिकेकडे तक्रारी करतात.

महापालिका अतिक्रमण निर्मुलन विभाग अतिक्रमण हटविण्याची कारवाई करते, सायंकाळी पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमणधारक आपला ठिय्या मांडतात. असा पाठशिवणीचा खेळ कायम पाहायला मिळतो.

....कर्मचारी जाणार नाहीत

दुकानदाराची तक्रार आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी लागते. यावर महापालिकेने अजब शक्कल लढवीत, आता दुकानदारांनाच अतिक्रमण काढण्याची जबाबदारी सोपविली आहे. तुमच्या दुकानासमोर अतिक्रमित दुकान लावू देउ नये. ही जबाबदारी आपलीच आहे.

असे महापालिकेचे लेखी आदेश असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. फुले मार्केटमध्ये अतिक्रमण न होण्याची जबाबदारी दुकानदारांवर सोपविली आहे. पण आदेशात अजब अस की, जरी त्याठिकाणी अतिक्रमण झाले तरी महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी ते काढायला जाणार नाहीत. असेही त्यांना कळविण्यात आले आहे.

कारवाईच झाली बंद

प्रशासनाच्या फतव्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाने फुले मार्केटमधील अतिक्रमण हटविण्याची कारवाईच बंद केली आहे. त्यामुळे आता फुले मार्केट आता अतिक्रमण न होवू देण्याची जबाबदारी दुकानदारांची आहे. त्यांनी दुकानासमोर अतिक्रमण न होवू देण्याची काळजी घेण्याची गरज आहे. आता दुकानदारांनाही अतिक्रमण झाल्याची तक्रार करता येत नाही.

अतिक्रमणधारक बिनधास्त

दुकानासमोर अतिक्रमण झाल्यास दुकानदारांवर जबाबदारी निश्‍चित करतांना, कोणी विक्रेत्यांने रस्त्यावर दुकान लावल्यास त्याला ते लावू द्यायचे नाही, त्यांनी त्याला मज्जाव करायचा . त्यामुळे अतिक्रमणधारक बिनधास्त झाले आहेत. रस्त्यावर दुकान लावल्यास दुकानदाराचे बोलण्याचे धाडस नाही, अतिक्रमणधारक कारवाईसाठी येत नाहीत. त्यामुळे आता फुले मार्केट अतिक्रमणधारक विक्रेत्यांचे स्वतंत्र बेट झाले आहे.

सामान्यांना मात्र त्रास

महापालिकेने आदेश दिल्याने फुले मार्केटचे कर्मचारी महापालिकेकडे तक्रार करीत नाही, दुसरीकडे दुकानासमोर अतिक्रमणधारक उभा राहिला तरी त्याला अटकाव करण्याची त्यांच्याकडे हिमंत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी अतिक्रमणधारकांचे धाडस वाढले आहे. कारवाईच होत नसल्याचे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढले आहे त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांस मार्केटमध्ये जायचे असल्यास गर्दीतून धक्के खातच जावे लागत आहे.

प्रशासनाचा मनमानी कारभार

महापालिकेत प्रशासक नियुक्तीनंतर नव नवीन आदेश निघू लागले आहेत. फुले मार्केटमध्ये अतिक्रमण काढण्यास कर्मचारीच जाणार नसल्याचा अजब आदेश कसा निघाला? महापालिका आयुक्त व प्रशासक विद्या गायकवाड यांनी या आदेशाला मंजुरी दिली तरी कशी?त्या ठिकाणी नागरिकांना होणाऱ्या त्रासाचे काय?दुकानदार तक्रार करणार नाहीत.

मग नागरिकांनी तक्रार केल्यावर तरी अतिक्रमणांवर कारवाई होणार काय?हाच प्रश्‍न आहे. महापालिकेत अधिकाऱ्याचे असे मनमानी आदेश कसे निघू शकतात हाच आता प्रश्‍न निर्माण झाला आहे.

आमदार भोळेसोबत बैठक

फुले मार्केटमधील अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. महापालिकेने दिलेल्या या आदेशावरही आज आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांची बैठक झाली.

यावेळी महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे उपस्थित होते. आमदार भोळे यांनी कारवाईची जबाबदारी महापालिकेची असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.

"अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे, आम्ही दुकानदार व्यवसाय करणार की अतिक्रमणधारकांना हटविणार, महापालिकेचा आदेश चुकीचा आहे. अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी अन्यथा आम्ही व्यापारी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करू"-रमेश मताणी अध्यक्ष, फुले मार्केट असोशिएशन जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT