Devotees entering from outside the village. esakal
जळगाव

Maha Shivpuran Katha Jalgaon: पंडित प्रदीप मिश्रांची मंगळवारपासून श्री शिवमहापुराण कथा; भाविकांसाठी प्रवेश खुला

सकाळ वृत्तसेवा

Maha Shivpuran Katha Jalgaon : येथील वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी मंदिर संस्थानतर्फे पंडित प्रदीप मिश्रा यांची श्री शिवमहापुराण कथा मंगळवार (ता. ५) पासून होत आहे. सुमारे पाच लाख भाविक येतील असा अंदाज आहे.

५ लाख चौरस फूट आकारात मंडप उभारण्यात आला आहे. सर्व भाविकांसाठी प्रवेश खुला आहे. (Shri Shiv Mahapuran Katha by Pandit Pradeep Mishra from Tuesday jalgaon news)

व्हीआयपी पासेस देण्यात येणार नाहीत, अशी माहिती आयोजक जगदीश चौधरी यांनी रविवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत दिली. हरिष मुंदडा, प्रवीण प्रजापत, श्री. मोरे उपस्थित होते. महिलांची कलशयात्रा सोमवारी (ता. ४) सकाळी सातला खेडी गावातून मंडपापासून निघेल. सोमवारी सायंकाळी पंडित मिश्रा यांचे जळगाव रेल्वे स्थानकात आगमन होईल. त्यानंतर रेल्वे स्थानक कानळदा रोडमार्गे त्यांची शेाभायात्रा काढण्यात येईल.

५ ते ११ डिसेंबरदरम्यान दुपारी दोन ते सायंकाळी पाचदरम्यान श्री शिवमहापुराण कथा होईल. कथेसाठी येणाऱ्या भाविकांच्या निवास, पिण्याचे पाणी, भोजन, आरोग्य, शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. ४ तात्पुरती लहान रुग्णालये जिल्हा रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतर्फे सुरू केली जातील.

४ रुग्णवाहिका, कार्डियाक रुग्णवाहिका याठिकाणी असतील. सर्व प्रकारचे औषधे उपलब्ध असतील. भोजनात पोळी, भाजी, वरणभात, गोड असे पदार्थ, तर रात्री मसाले भात, कढी असा मेनू असेल. मंडपाच्या चारही बाजूंनी पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था असेल.

पार्किंगची व्यवस्था

मंडपाच्या चारही बाजूंनी पाचशे मीटर अंतरावर सर्व प्रकारच्या वाहनांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भुसावळ परिसरातून येणाऱ्या भाविकांची वाहने तरसोदपासून भादली मार्गे वडनगरी फाट्याकडील मंडपाकडे येऊ शकतील. चोपडा, मध्यप्रदेशाकडून येणाऱ्या वाहनांसाठी कानळदा मार्गे, धुळेकडून येणाऱ्या वाहनांसाठी जळगावमधील जुना खेडी रोड मार्ग मंडपाकडे आहे. बसगाड्यांची थांबण्याची व्यवस्था आहे.

दागिने आणू नयेत सोबत

धुळे येथे झालेल्या कार्यक्रमात सुमारे दोन किलो दागिने चोरीस गेले आहेत. त्यामुळे महिलांनी अंगावर कोणत्याही प्रकारची दागिने आणू नयेत. मोजके पैसे आणावेत. कथेसाठी येताना सार्वजनिक वाहनांनी यावे, असे आयोजकांतर्फे स्पष्ट करण्यात आले.

गर्भवतींसह दिव्यांगासाठी वेगळी सोय

गर्भवती, अपंग, दिव्यांगांसाठी कथेच्या ठिकाणी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. महाआरतीसाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह इतर कार्यालयातील अधिकारी, ज्यांनी अन्नदानाच्या वस्तू दिल्या आहेत, अशांना निमंत्रित करण्यात आले आहे. आरतीसाठी कोणत्याही प्रकारचा निधी घेतला गेला नाही. भाविकांनी आरतीसाठी पैसे न देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ठळक नोंदी

० कथेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार येण्याची शक्यता आहे. त्यांचा दौरा वेळेवर ठरेल, असे आयोजकांनी सांगितले.

० कथेसाठी भाविकांनी मंडपात आपली जागा सांभाळली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातून, परदेशातून भाविक येणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील भाविक येथे राहण्यासाठी आले आहेत

० पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथा प्रवचनासाठी येथील कारागिरांकडून व्यासपीठ उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. याठिकाणी हिमालय पर्वताचा देखावा असेल.

० कार्यक्रमस्थळी नागरिकांच्या सुविधांसाठी २ हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली. त्यात २५ ते ४५ वर्षे वयोगटांतील सेवाधारी आहेत. मंडप उभारणीसह इतर कामांसाठी ४०० ते ५०० कर्मचारी कार्यरत आहेत.

० भाविकांसाठी या ठिकाणी भोजनांची व्यवस्था करण्यात आली आहे. अगोदर २५ हजार जणांसाठी भोजन करण्यात येणार होती. मात्र आता २ लाख भाविकांसाठी दररोज जेवण बनवले जाणार आहे.

० देणगीदारांकडून गहू, तांदूळ, डाळ, तेल, तिखट, तूप आदी देण्यात येत आहे. चुलीवर अन्न शिजवले जात आहे. त्यासाठी लाकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

० श्री शिवमहापुराण कथा मंगळवारपासून सुरू होत आहे. परंतु भाविकांची आत्तापासून मंडपात बसण्यासाठी गर्दी सुरू झाली आहे. बाहेरगावांहून आलेल्या भाविकांनी आपली जागा सांभाळली आहे. ते मुक्काम करत आहेत.

० कथेच्या निमित्ताने वडनगरी फाट्यावरील बडे जटाधारी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे. रविवारी भाविकांनी गर्दी केली होती.

० कथेच्या ठिकाणी ५० मोठे एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविक कोठेही बसले, तरी त्यांना पंडित मिश्रा यांच्या प्रवचनाचा लाभ घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar: मूळ टार्गेट वेगळं होतं, आयुष कोमकरला कसं संपवलं? गुन्हेगारांचा संपूर्ण प्लॅन समोर, पुणे पोलिसांनी काय सांगितलं?

Nagpur Railway Update : विदर्भ आणि पंचवेली एक्स्प्रेसला नवीन थांबे, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

Latest Marathi News Updates: मुसळधार पावसामुळे धामणी धरण ओव्हरफ्लो, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koregaon News: 'कोरेगावात नवीन पाच बसचे लोकार्पण'; आगारात मान्यवरांच्या हस्ते पूजन, प्रवाशांसाठी दळणवळण सेवा सुलभ

Education News : दीडशे कोटींच्या थकबाकीने शिक्षक हैराण; सेवानिवृत्त व रात्रशाळा शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT