Shasan Aplya Dari esakal
जळगाव

Jalgaon News : महापालिकेतर्फे शहरवासीयांसाठी 6 बस; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम मंगळवारी (ता. २७) होणार आहे. त्यासाठी बाहेरगवाहून वाहने घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठी सात ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे.

त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासह सर्व सुविधा महापालिकेने केल्या आहेत, तर जळगाव शहरातील नागरिकांना कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी सहा बसची व्यवस्था केली आहे. (Six buses for city residents by Municipal Corporation Shasan Aplya Dari Program Facility at parking lot Jalgaon News)

एकलव्य क्रीडा संकुल मैदान, जी. एस. मैदान, नेरी नाका ट्रॅव्हल्स स्टॉपसमोरील मैदान, सागर पार्क, खानदेश सेंट्रल मॉल, एस. टी. वर्कशॉप मैदान, ब्रुक ब्रॉन्ड कॉलनी रिंग रोड या ठिकाणी पार्किंगची सोय केली आहे.

महारपालिकेतर्फे प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट (फिरते शौचालय), विजेच्या अडीअडचणीसाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांसह दोन शाखा अभियंत्यांची नियुक्ती, पिण्याचे टॅंकर, कचरा संकलनासाठी घंटा गाडी व त्यावर एक युनिटप्रमुख, दहा सफाई कामगार गार्बेज बॅगसह, एक मुकादम, अशी स्वच्छतेची व्यवस्था केली आहे.

महापालिकेने प्रत्येक पार्किंग ठिकाणी मदत कक्ष उभारला असून, त्यात दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जळगाव शहरातील रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी १२५ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, प्रत्येकी ५० फुटावर एक कर्मचारी गणवेशात मैदानावर असेल. ५० आशा वर्कर्सची नियुक्तीही लाभार्थी महिलांच्या मदतीसाठी केली आहे.

पोलिस कवायत मैदानावर महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी दहा शीट असलेले सात फिरते शौचालये असतील.

मुख्य कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारापासून पाण्याचे जार व मैदानावर दहा ठिकाणी प्रत्येकी एकप्रमाणे महिलांसाठी स्वतंत्र फॅब्रिकेटर स्वच्छतागृह असतील. शासनाच्या योजनांची माहिती नागरिक व लाभार्थ्यांना व्हावी, यासाठी माहिती स्टॉल लावण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Protest: कोकणातील शेतकरी मुंबईत आक्रमक! बडे नेते आणि आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु; काय आहे मागणी?

Election Fraud: मतदानानंतर उघड झाला मोठा खेळ! ‘या’ राज्याच्या निवडणुकीत अवैध मतदान; १० विदेशी नागरिकांसह चार महिला अटकेत

High Court : ती मशीद नाही तर देवी सरस्वतीला समर्पित मंदिर ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल

हार्दिक श्रेयस विसरा! रवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी सुचवलं 'हे' नाव म्हणाला मला...

Suvendu Adhikari: बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला; कोणती जागा सोडली? राजीनाम्यानंतर भावूक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT