Smack high Speed Electric Scooter esakal
जळगाव

Jalgaon : सिका E motorsच्या Smack high speed electric scooterचे अनावरण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सिका इ मोटर्सच्या ‘स्मॅक’ या हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटरचा अनावरण सोहळा उत्साहात झाला. स्वदेशी असलेली ई स्मॅक स्कूटर बॅटरीवर चालणारी असून स्कूटर संपूर्ण चार्ज केल्यास १०० किलोमीटर चालेल कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

ग्राहकांनी ई स्कूटरचा अधिक वापर करून जळगाव शहर प्रदूषण मुक्त करण्यास हातभार लावावा असे आवाहन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम पाटील करत दररोज कंपनीतर्फे दोनशे ई स्कूटर बनविण्यावर जोर देण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

पुढे बोलताना श्री. पाटील म्हणाले, ३३ वर्षापासून ऑटोमोबाईल क्षेत्रात यशस्वीरीत्या सर्व्हिस देऊन उत्कृष्ट सर्व्हिस देणे हेच कर्तव्य मानून वाटचाल करत आहोत. ‘स्मॅक’ ही स्कूटर आरटीओ पासिंग प्रकारातील आहे. यात ६० व्होल्टची दमदार लिथियम आयन बॅटरीचा समावेश आहे. यामुळे स्कूटर प्रतिचार्ज १०० किलोमीटर चालेल. (Smack high speed electric scooter unveiled by Seeka E motors Jalgaon News)

स्कूटरध्ये डिजिटल डिस्प्ले, रिजनरेटिव्ह कंट्रोलर, टेलिस्कोपिक सस्पेंशन, अँटीथेफ्ट अलार्म सिस्टिम, रिव्हर्स गियर, साइड स्टॅन्ड सेन्सर, ट्युबलेस टायर्स तसेच यूएसबी चार्जर यासारख्या सुविधा उपलब्ध असून, स्कूटर ७ वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. खानदेशातल्या प्रत्येक शहर, गाव, खेडेमधील नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर परिसर प्रदूषण मुक्त करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी साईराम प्लास्टिकचे संचालक प्रमोद पाटील, ‘सिका’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, व्यवस्थापक अविनाश पाटील, पगारिया ऑटोचे संचालक पुखराज पगारिया, सातपुडा ऑटोचे संचालक डी. डी. बच्छाव, बँक ऑफ महाराष्ट्र च्या झोनल मॅनेजर रश्मीरेखा पती, चिन्मय क्रिटिकल केअर सेंटरचे डॉ. राहुल महाजन, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष युसूफ मकरा, मेडिकल डीलर्स असोसिएशनचे सुनील भंगाळे आदी उपस्थित होते. प्रमोद पाटील यांनी आभार मानले.

तत्काळ स्कूटरचे बुकिंग

वाढते प्रदूषण आणि इंधनाची बचत यासाठी इलेक्ट्रिक वाहन किती आवश्यक आहे याची गरज पाहता कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. जैन यांनी त्याच तत्काळ २५ स्कूटरची बुकिंग केली. त्यानंतर सर्जना मीडियाचे संचालक रवींद्र लड्डा यांनी ५ तर लक्ष्मी केमिकलचे संचालक सी. जे. सूर्यवंशी यांनी एक स्कूटर बुक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT