son stabbed his mother on chest for not paying for cigarettes jalgaon esakal
जळगाव

Jalgaon Crime : सिगारेटसाठी पैसे न दिल्याने आईच्या छातीवर चाकूने वार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सिगारेट घेण्यासाठी पैसे न दिल्याने पिंप्राळ्यातील एका मुलाने (Son) आईच्या छातीवर चाकूने वार केला. पिंप्राळा हुडकोतील प्रमिला गजानन साळुंखे (वय ४५) यांच्यावर जिल्‍हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (son stabbed his mother on chest for not paying for cigarettes jalgaon crime)

मंगळवारी (ता. ४) सकाळी साडेआठच्या सुमारास देवेंद्र साळुंखे याने त्याच्या वडिलांकडे सिगारेट पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावरून वादाला सुरवात झाली. वादात मध्यस्थी करणाऱ्या आई प्रमिला यांना देवेंद्रने शिवीगाळ करून दमदाटी केली.

वाद विकोपाला जाऊन देवेंद्रने आई प्रमिला साळुंखे यांच्या छातीवर चाकूने वार करून जखमी केले. अचानक रक्ताची धार लागून प्रमिला खाली पडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. तोपर्यंत देवेंद्र घरातून पळून गेला. गजानन साळुंखे यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने जखमी प्रमिला यांना जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रामानंदनगर पोलिसांनी जखमी प्रमिला साळुंखे यांच्या जबाबावरून देवेंद्र गजानन साळुंखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक फौजदार कालसिंग बारेला तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT