Farmer Farmer
जळगाव

पावसाने ओढ दिल्याने उडीद, मूग, सोयाबीनची पेरणी गेली वाया

सोयाबीनच्या पेरण्यांची वेळ निघून गेल्याने नवीन पेरण्या होणार नाहीत

देविदास वाणी



जळगाव : जिल्ह्यात पावसाने (Rain) ओढ दिल्याने खरीप पिकांच्या (Kharif crops) उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आतापर्यंत पेरलेल्या उडीद, मूग, सोयाबीनच्या पेरण्यांपैकी ३० ते ४० टक्के पेरण्या वाया (Crop Damage) गेल्या आहेत. जी पिके वर आली त्यांना शेतकरी (Farmers) चुहा पद्धतीने पाणी देऊन पिके वाचवीत आहेत. यानंतर उडीद, मूग, सोयाबीनच्या पेरण्या होणार नाहीत. या पिकांसाठी ५ जुलै ही शेवटीच तारीख असते. कोरडवाहू कपाशी (Cottan) पेरण्याचा कालावधी अजून ३० जुलैपर्यंत असल्याने कपाशीचे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे येईल, अशी अपेक्षा आहे. (sowing urad green gram and soybean was wasted due to rains)


गेल्या १५ ते १७ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. ९ जुलैला पाऊस झाला, मात्र तो केवळ जळगाव शहरापुरता मर्यादित होता. ग्रामीण भागात पाऊसच हवा तसा झाला नाही. रविवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला. मात्र त्याचा फारसा जेार नव्हता. तीन-चार तास झालेल्या पावसाने महामार्ग व रस्ते ओले झाले. रस्त्यावर असलेले खड्डे पाण्याने भरले. मात्र शेतात मुरण्याएवढा जोरदार पाऊस झाला नाही. सकाळी अकरानंतर सर्वत्र पावसाने उघडीप दिली होती. अशा स्थितीत पिके टिकतील कशी? ज्या पेरण्या झालेल्या आहेत त्यांना पाणी न मिळाल्याने पिके मान टाकू लागली आहेत. दुसरीकडे उन्हाची तीव्रता वाढत आहे. जर आगामी काळात जोरदार पाऊस झाला नाही तर पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.

तूर, कपाशीकडे कल
पावसाच्या ओढीने सोयाबीनच्या पेरण्या वाया गेल्यात जमा आहे. आता सोयाबीनच्या पेरण्यांची वेळ निघून गेल्याने नवीन पेरण्या होणार नाहीत. ५ जुलै ही उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी लागवडीची वेळ असते. ती आता निघून गेल्याने शेतकरी बाजरी, तूर, कोरडवाहू कपाशीकडे मोठ्या प्रमाणात वळतील. कोरडवाहू कपाशीत अंतरपीक म्हणून तूर, बाजरी घेता येते. आंतरपीक म्हणून शेतकऱ्यांना ही पिके घ्यावीच लागतील. ३० जुलै ही कोरडवाहू कपाशी लागवडीची वेळ आहे.

...तर कपाशीच्या उत्पादनात घट येणार
७० ते ७५ हजार हेक्टरवर बागायती कपाशीच्या पेरण्या झाल्या आहेत. आता कोरडवाहू शेतकरी कपाशीच्या पेरण्या करतील. आगामी काळात पाऊस येईल असे गृहीत धरून शेतकरी पेरण्या करतील. मात्र पाऊस न झाल्यास कपाशीच्या उत्पादनातही घटीची शक्यता आहे.

पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, उडीद, मुगाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. दुबार पेरणी करू मात्र त्याचीही मुदत निघून गेली आहे. निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी हैराण झाला आहे. आता बाजरी, तूर, कपाशीवर पिके घेण्याकडे आमचा कल राहील.
-किशोर चौधरी, शेतकरी


जिल्ह्याचे चित्र (हेक्टरमध्ये)
* पेरणी झालेले क्षेत्र-- ५ लाख ५० हजार ३८ * बागायती कपाशी-- २ लाख ११ हजार १३६
* जिरायत कपाशी -- २ लाख २४ हजार १७५
* ज्वारी--- १५ हजार १७४
* बाजरी-- ३ हजार ५०९
* मका-- ५३ हजार २६३
* तूर, मूग, उडीद-- प्रत्येकी ४४ हजार हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT