farmer  sakal
जळगाव

जळगाव जिल्ह्यात सव्वासात लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या

पावसाच्या पाठशिवणीच्या खेळामुळे जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे.

सुधाकर पाटील

भडगाव (जि. जळगाव) : रोज आकाशात ढग येतात. पावसाचे वातावरणही तयार होते. मुसळधार पाऊस होईल, असे वाटते. मात्र, पाऊस पडत नाही. पावसाच्या पाठशिवणीच्या खेळामुळे जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. बागायती कपाशीचे पीक वाचविताना तो रडकुंडीला आला आहे. ‘मान्सून’च्या भरवश्‍यावर लागवड केलेले मक्याचे कोंब जमिनीबाहेर निघण्यापूर्वीच कोमजू लागली आहेत. जिल्ह्याच्या एकूण पावणेआठ लाख लागवडीयुक्त क्षेत्रापैकी तब्बल सव्वासात लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत.

यंदा ‘मान्सून’ ठरल्यापेक्षा लवकर दाखल होईल, असा अंदाज व्यक्त झाला. मात्र, जून महिना निम्मा संपूनही ‘मान्सून’ जिल्ह्यात बरसलेला नाही. त्यामुळे बागायती कापसासह इतर पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणणारे ढग रोज अंधार करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे.

कापसाला ‘चुआ’चा आधार

खरीप हंगामात जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड होते. जिल्ह्याच्या पाऊणेआठ लाख लागवडीयुक्त क्षेत्रापैकी तब्बल पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार हेक्टरवर बागायती कापसाची, तर इतर मिळून जिल्ह्यात आतापर्यंत ४७ हजार ६२८ हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. ज्याच्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी दिवस रात्र करून पाणी देत आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांना कापूस वाचविण्यासाठी अक्षरशः ‘चुआ’चा (डब्ब्याने पाणी देणे) आधार घ्यावा लागत आहे. अनेकांनी ‘मान्सून’ यंदा लवकर दाखल होईल, या हवामान खात्याच्या अंदाजावरून मक्याची जूनच्या पहिल्याच आठवड्यात लागवड केली आहे. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने मातीतून कोंब निघण्याच्या आधीच ते कोमजू लागली आहेत. सर्वसाधारणपणे ७ जूनला मृग नक्षत्रावर पाऊस बरसतो. मात्र, हा मुहूर्त जाऊन आठवडा होऊनही पाऊस पडलेला नाही. खरीप लांबला तर रब्बी हंगामही पुढे जातो. त्यामुळे खरीप आणि रब्बीचे गणित बिघडल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. एकीकडे मान्सूनपूर्व वादळी पावसाने केळीसह फळपिकांचे नुकसान केले, तर दुसरीकडे ‘मान्सून’ने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांचे नियोजनच कोलमोडले आहे.

नेहमीप्रमाणे अंदाज ठरला फोल

हवामान खात्याचा अंदाज नेहमीप्रमाणे यंदाही फोल ठरला आहे. हवामान खात्याने यंदा ‘मान्सून’ लवकर दाखल होईल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, १५ जून येऊनही ‘मान्सून’ तोंड दाखवायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी फसव्या अंदाजाने चांगलेच अडचणीत आले आहेत. भडगाव तालुक्यातही साडेतीन हजार हेक्टरवर बागायती कापसाची, तर ४५० हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे. ही लागवड पावसाअभावी धोक्यात आली आहे.

''जिल्ह्यात अजूनही मान्सून सक्रिय न झाल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. बागायती कापसाची काही प्रमाणात लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.'' - संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT