sparrow count activity 8000 sparrows recorded from 31 districts in state jalgaon news esakal
जळगाव

Sparrow Count Activity : राज्यात 31 जिल्ह्यांतून 8 हजार चिमण्यांची नोंद!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : निसर्गमित्र जळगावतर्फे जागतिक चिमणी दिनानिमित्त तीनदिवसीय ऑनलाइन झालेल्या चिमणी गणनेत (Sparrow Count) महाराष्ट्रातील ३१ व अन्य राज्यातील दोन, अशा एकूण ३३ जिल्ह्यांतील नागरिकांनी सहभाग घेत एकूण सात हजार ८९१ चिमण्यांची नोंद केली. (sparrow count activity 8000 sparrows recorded from 31 districts in state jalgaon news)

१८ ते २० मार्च, असे तीन दिवस हा महाराष्ट्रव्यापी चिमणी गणनेचा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.

असा मिळाला प्रतिसाद

यात राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यानुसार जळगावातून ७०, पुणे २७, कोल्हापूर २५, सांगली २४, नगर २२, नाशिक १६, धुळे १२, ठाणे १२, मुंबई ८, अमरावती ८, यवतमाळ ५, लातूर ४, सोलापूर ४, चंद्रपूर ४,

पालघर ३, अकोला ३, सातारा ३, नागपूर २, भंडारा ३, रत्नागिरी २, वाशीम २, रायगड २, बुलढाणा २ नंदुरबार २, छत्रपती संभाजीनगर २, जालना १, गोंदिया१, वर्धा १, नांदेड १, सिंधुदुर्ग १, हिंगोली १, तसेच मध्य प्रदेशातील भोपाळ आणि कर्नाटक येथील बंगळुरूमधून प्रत्येकी १ याप्रमाणे नागरिक सहभागी झालेत.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

चिमण्यांच्या नोंदीत जळगाव अव्वल

प्रत्येक जिल्ह्यातून नागरिकांनी त्यांनी केलेल्या चिमण्यांच्या संख्येची नोंद ऑलनाइन पद्धतीने पाठविली. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक १,७०३ चिमण्यांची नोंद मोर आली. पुणे जिल्ह्यातून १,३४७, नाशिक १,१८३, सांगली ६१३, कोल्हापूर ५७५ आणि नगर जिल्ह्यातून ३३१ चिमण्या नोंदविण्यात आल्याचे समोर आले.

"चिमण्यांची संख्या आपल्या भागात किती हे समजावे, त्या का कमी होत आहेत, याविषयी जागरूकता निर्माण व्हावी व चिमणीविषयी प्रेम व पर्यावरणाविषयी आस्था वाढावी हा या उपक्रमामागचा उद्देश होता." -शिल्पा व राजेंद्र गाडगीळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT