ssc student commit suicide jalgaon news
ssc student commit suicide jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : इतकं प्रेशर आलं की, त्याने मृत्युला कवटाळलं..! दहावीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील गणेश कॉलनीतील दहावीच्या विद्यार्थ्याने रात्री गच्चीवरील खोलीत गळफास घेतल्याची घटना घडली.

शैक्षणिक स्पर्धा आणि अभ्यासाचा अतिरिक्त तणाव असह्य झाल्याने या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळल्याचे भयानक वास्तव समोर आल्यावर परिसरातील पालकांमध्ये कामालीची भिती निर्माण झाली आहे. तन्मय गजेंद्र पाटील (वय १४) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

जिल्‍हा रुग्णालयात परिचीत, नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय पाटील हा शहरातील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. (ssc student commit suicide jalgaon news)

नववी उत्तीर्ण झाल्यानंतर दहावीचे वर्ष खूप महत्वाचे असते म्हणून तो बऱ्यापैकी अभ्यासालाही लागला होता. शाळा, शिकवणी आणि अभ्यासासाठी त्याची सारखी धावपळ सुरु होती.

यातूनच तो काही दिवसांपासून तणावात होता. मंगळवारी (ता. ३) कुटूंबासह रात्रीचे जेवण केल्यावर आई-वडील व मोठा भाऊ खाली झोपले होते. त्यावेळी तन्मय अचानक वरच्या मजल्यावर निघून गेला. वडील गजेंद्र पाटील यांना लघुशंकेसाठी जाग आली असता, तन्मय बिछान्यावर दिसत नाही, म्हणून त्यांनी घरात शेाध घेतला. नंतर वरच्या मजल्यावर आले. तेव्हा त्यांना तन्मयने गळफास घेतल्याचे आढळून आले.

पित्याचा आक्रोश अन्...‌

वडील गजेंद्र पाटील यांनी तन्मयला बघताच त्यांना धक्का बसला. तन्मयच्या नावे किंचाळी मारतच त्यांनी आक्रोश केला. अचानक अवाजाने त्याची आई व मोठा भाऊ यांनीही धाव घेतली. तन्मयची अवस्था पाहून कुटूंबीयांना काही सुचेनासे झाले. शेजारी परिचितांच्या मदतीने तन्मयला दवाखान्यात नेण्यात आले.

जिल्‍हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय महाविद्यालयात डॉ. आदित्य साळुंखे यांनी तपासणीनंतर त्यास मृत घोषित केले. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार संतोष सोनवणे तपास करीत आहेत. तन्मयच्या मागे आई-वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.

भावस्पर्शी ‘सुसाईड नोट’

तन्मय याने आई-वडील अन्‌ भावासाठी ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली असून, त्याला असह्य होत असलेल्या तणावाचा त्यात उल्लेख करण्यात आला आहे. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून, त्या अनुषंगाने दाखल अकस्मीक मृत्यूचा तपास करण्यात येणार असल्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी सांगीतले.

मित्रांनाही धक्का

ए. टी. झांबरे विद्यालयात तन्मयच्या वर्गमित्रांना बुधवारी सकाळी घटनेची माहिती झाली. त्यांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. तर, शिक्षकांसह पाटील कुटूंबीयांचे परिचीत, नातेवाईक या घटनेतून प्रचंड व्यथित झाले आहेत. तन्मयच्या मृत्युचे कारण, पालकांची जबाबदारी, विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि तणाव मुक्तीचे विषय आता चर्चेला येवू लागले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT