Staff along with police inspector arrested while taking bribe jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : पोलिस निरीक्षकासह कर्मचारी, पंटरला लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe Crime : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बायोडिझेल विक्री प्रकरणात पकडलेल्या संशयितांच्या साथीदारास सहआरोपी न करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह रायटर तुषार पाटील आणि खासगी पंटर ऋषी दुर्गादास शुक्ला यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. (Staff along with police inspector arrested while taking bribe jalgaon crime news)

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बायोडिझेल वाहतूक करणारा टँकर पकडून भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिला होता. या गुन्ह्यात सहआरोपी न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे पाच लाखांची मागणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केली.

तडजोडीअंती तीन लाख रुपये देण्याचे ठरले. नंतर तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मंगळवारी (ता. १८) पोलिस निरीक्षक गायकवाड आणि रायटर तुषार पाटील यांच्या सांगण्यावरून खासगी पंटर ऋषी दुर्गादास शुक्ला (रा. हनुमान वाडी, भुसावळ) याने तक्रारदाराकडून तीन लाखांची लाच स्वीकारताच धुळे एसीबीच्या पथकाने पकडले.

तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील, संतोष पावरा, रामदास बारेला, चालक सुधीर मोरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकबराच्या बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बापही पैदा झाला नव्हता तेव्हा...; कुंभमेळ्यावरून फडणवीस गरजले

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात येतोय शेतात राबणारा काळ्या आईचा पुत्र

माेठी बातमी! शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा ‘व्हायरल; उत्तर सोलापूर, सांगोला वगळून माढा, माळशिरसमधून जाणार !

Latest Marathi News Live Update : प्रभाग 59 मध्ये अपक्ष उमेदवार सचिन शिवेकर यांना मुंबई डबेवाला संघटनेचा पाठिंबा

भाजपकडून पैशांच्या पाकिटांचं वाटप, शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडलं; VIDEO आला समोर

SCROLL FOR NEXT