Guardian Minister Gulabrao Patil while giving help to the families of suicide victims. Neighbor Beneficiary
Guardian Minister Gulabrao Patil while giving help to the families of suicide victims. Neighbor Beneficiary  esakal
जळगाव

Gulabrao Patil | ‘उभारी’साठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम गरजेचे : गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटुंब असह्य होते. विशेषत: शेतकरी बांधवांच्या कुटुंबीयांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी या कुटुंबांच्या ‘उभारी’साठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे. (statement of gulabrao patil about necessary to work with spirit of social commitment for Ubhari jalgaon news)

या भावनेतूनच ‘उभारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अशा कुटुंबांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले.

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा मदतीचा धनादेश शासकीय अजिंठा विश्रामगृहात देण्यात आला. पशुहानी झालेल्या सहा व्यक्तींना शासकीय अर्थसहाय्यही देण्यात आले.

कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या वारसास ५० लाख

जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील तहसील कार्यालयातील कर्मचारी नाना लक्ष्मण वाघ (कोतवाल) (रा. शिरसोली) यांचा कर्तव्य पार पाडताना कोरोना विषाणू संसर्गाने २८ मार्च २०२१ ला मृत्यू झाला होता.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

पालकमंत्री पाटील यांच्या पाठपुराव्याने शासनाकडून ५० लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे. आठवड्याभरात (कै.) नाना वाघ यांच्या नामनिर्देशित वारसास ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य धनादेशाद्वारे देण्यात येणार आहे.

तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, उप जिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, दूध संघ संचालक रमेश पाटील, नंदलाल पाटील, अर्जुन पाटील, जना आप्पा कोळी, शिवराज पाटील, रवी कापडणे, सचिन पवार, महानगरप्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, अजय पाटील, तहसीलदार नामदेव पाटील, महसूल सहाय्यक जयश्री मराठे आदी उपस्थित होते. तहसीलदार पाटील यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT