Jalgaon: Former Mayor Jayashree Mahajan during the 'Hovu Dya Charcha' program at Nimkhedi on Saturday. Shiv Sena District Chief Vishnu Bhangale, former Deputy Mayor Kulbhushan Patil, Shiv Sena Metropolitan Chief Sharad Taide etc. esakal
जळगाव

Jalgaon News : केंद्रातील भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली : जयश्री महाजन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : काळे धन भारतात आणू, बेरोजगारांना नोकऱ्या देवू, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशी आश्‍वासने भाजपने निवडणूकपूर्वी दिली होती.

mपरंतु सत्तेवर आल्यावर त्यातील एकही पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. असा आरोप माजी महापौर जयश्री महाजन यांनी केला.(statement of jayshree mahajan BJP government cheating people jalgaon news)

शिवसेना ठाकरे गटातर्फे शनिवारी (ता. ७) आहुजानगर, निमखेडी येथे झालेल्या ‘होवू द्या चर्चा’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नागरिकांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, की भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले.

त्यामुळे या ठिकाणी विकास होत नाही. युवकांना नोकरी देण्याचे आश्‍वासन देणाऱ्या सरकारने युवकांच्या हाताला कामच दिलेले नाही. परिणामी आज लाखो युवक शिक्षण घेवून बेरोजगार आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव दुप्पट करू असे आश्‍वासन त्यांनी दिले.

मात्र, आज शेतकऱ्यांच्या मालाचे भाव दुप्पट तर सोडाच; परंतु त्यांच्या मालाला आवश्‍यक तो भावही मिळत नाही. त्यामुळे त्यांना कांदे, टमाटे रस्त्यावर फेकण्याची वेळ आलेली आहे. केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार हे केवळ जनतेची फसवणूक करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहानगर प्रमुख शरद तायडे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरडकर, शाकीर खान, उपमहानगरप्रमुख निलेश ठाकरे, आयोजक उपमहानगरप्रमुख गणेश गायकवाड आदींसह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT