Anil Mahajan, President of Chatak Nature Conservation Society, Uday Chaudhary, Alok Bhave, Ashwin Mohan, Mita Gala, Dr. while studying the winter migratory birds at the reservoir. Kalyani cloth etc. esakal
जळगाव

Jalgaon News : हतनूर जलाशयावर वाटसरू पक्ष्यांचा अभ्यास; प्रथमच आढळला जाड चोचीचा ‘वटवट्या’

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : चातक निसर्ग संवर्धन संस्था, वनविभाग जळगाव आणि मुंबई येथील पक्षी तज्ज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील हतनूर जलाशय आणि मुक्ताई भवानी वन्यजीव अभयारण्य येथे हिवाळी स्थलांतरित वाटसरू पक्ष्यांचा अभ्यास करण्यात आला. यात प्रथमच जाड चोचीचा वटवट्या हा पक्षी आढळून आला. (Study of Migratory Birds at Hatnur Reservoir jalgaon news)

त्यासोबत युरोपियन नीलकंठ, निळ्या गालाचा राघू, वृक्ष तिर चिमणी आदी पक्षी आढळून आले. पावसाळ्यात प्रजननासाठी येणारे नवरंग, चातक, सामान्य कोकीळ, पट्टेदार कोकीळ, कोतवाल कोकीळ, राखी छातीचा कोकीळ, पावश्या आदी पावसाळी प्रजनन करणारे पक्षी आढळले.

या पक्षी अभ्यास दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी अभ्यासक अनिल महाजन, मुंबई येथील पक्षी तज्ज्ञ अलोक भावे, अश्विन मोहन, डॉ. मिता गाला, डॉ. कल्याणी कापडी तर चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे, उदय चौधरी, सौरभ महाजन यांनी सहभाग घेतला. जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री ए. प्रवीण, दिगंबर पासपांडे, श्री. आसुरे यांनी सहकार्य केले.

वाटसरू पक्ष्यांबद्दल थोडक्यात

आपण सर्व जाणतोच, की हिवाळा सुरू होताच उत्तरेकडील देशातून म्हणजे जेथे थंडीने नदी जलाशय गोठतात व अति शीत वातावरण तयार होते. त्यामुळे तेथील पक्षी दक्षिणेकडील देशांमध्ये स्थलांतर करतात. भारतामध्ये मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी येतात.

काही पक्षी उत्तर भारतात, काही पक्षी मध्य भारतात, जसे हतनूर धरण जलाशय येथे थांबतात तर काही पक्षी अधिक पुढे जाऊन दक्षिणेकडील राज्यांमध्ये जाऊन स्थिरावतात, दक्षिण भारतात भारतात जाणारे पक्षी काही काळ हतनूर धरण जलाशय परिसरात थांबतात व एक दोन आठवड्यात पुढे निघून जातात त्यांना वाटसरू पक्षी असे संबोधले जाते, असे पक्षी अभ्यासक तथा चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT