While saying farewell to the girl who was in a state of death, Dr. Satyawan More etc.  esakal
जळगाव

Jalgaon GMC News : अत्यवस्थ बालिकेस मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर; ‘जीएमसी’च्या बालरोग विभागाचे यश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon GMC News : एका नऊवर्षीय बालिकेला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. अंतर्गत रक्तस्रावामुळे आणि रक्तातील साखर जास्त वाढल्याने प्रकृती अत्यवस्थ झाली होती.

या बालिकेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग व चिकित्सा शास्त्र विभागाने यशस्वी उपचार करून प्रकृतीत सुधारणा घडवून आणली. (success of pediatric department of GMC saves girl life jalgaon news)

वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी अभिनंदन केले.

जळगावातील जैनाबाद येथील सोनल बळिराम धांडे हिला श्वास घेण्यास त्रास होणे, भरपूर लघवी लागणे, सारखी तहान लागणे, अशा कारणांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीअंती तिला बाल मधुमेह असल्याचे, तसेच आतड्यांजवळ रक्तस्राव होणे, रक्तदाब कमी होणे अशी लक्षणे दिसून आली.

तिला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करून कृत्रिम श्वास यंत्रणेने उपचार करण्यात आले. रक्तातील साखर नियंत्रित करून प्रकृती स्थिर करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दोन दिवसांनी प्रकृती सुधारल्यावर तिला जनरल कक्षात दाखल केले होते. तिला रक्ताच्या थैल्या चढविण्यात आल्या.

या बालिकेवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार करण्यात आले. तिची प्रकृती उत्तम झाल्यावर तिला बालरोग विभागप्रमुख डॉ. सत्यवान मोरे यांच्या हस्ते रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

बालिकेवर उपचार करण्याकामी उपअधिष्ठाता डॉ. गजानन सुरवाडे, सहयोगी प्रा. डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. गिरीश राणे, डॉ. शिवहर जनकवाडे, डॉ. नीलांजना गोयल, डॉ. जयश्री गिरी, डॉ. प्रतिभा कदम, डॉ. अनिरुद्ध कारंडे, डॉ. मयूर घुगे, डॉ. सुरसिंग पावरा यांच्यासह इन्चार्ज परिचारिका संगीता शिंदे, माया सोळंकी यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT