Yogesh Deore leaving Mumbai airport for America.  esakal
जळगाव

Success Story : मोलमजुरी करणाऱ्या विधवा आईच्या कष्टाचे चीज! कळमसरेतील तरुणाची सातासमुद्रापार झेप

प्रा. हिरालाल पाटील

Success Story : येथील योगेश मधुकर देवरे (पाटील) यांची अमेरिका येथील ग्रॅन्युअल फार्मासिटिकल्स कंपनीत वॉशिंग्टन येथे निवड झाली.

कुटुंबामध्ये कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी योगेशचे पितृछत्र देखील हरपले. परंतु आपल्या परिस्थितीला न डगमगता परिस्थितीशी संघर्ष करीत शिक्षण घेतले. आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर योगेशने मोठी झेप घेतली आहे. (success story Yogesh Deore was selected in Washington D C at Granules Pharmaceuticals in America jalgaon news)

अगदी लहानपणापासून हुशार, संयमी, प्रामाणिक, मितभाषी अशी त्यांची ओळख गावात आहे. ते कळमसरे येथील (कै.) मधुकर किसन पाटील यांचे लहान पुत्र आहेत.

योगेशचे पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मुलांची शाळेत झाले. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथे घेतले. त्यानंतर प्रताप महाविद्यालय अमळनेर येथून बारावी विज्ञानपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर नंदुरबार येथील जिजामाता कॉलेज ऑफ फार्मसी येथून २०१९ मध्ये बी. फार्मसी पदवी संपादन केली.

शिक्षण घेताना आर्थिक अडचण होती. परंतु स्वतः मेहनत, आईने, भावाने मिळेल ते काम करून शिक्षण पूर्ण केले. मागील तीन वर्षांपासून तो गोवा येथील लुपिन फार्मासिटिकल्स येथे प्रॉडक्शन ऑफिसर म्हणून कार्यरत होता.

त्याची कामाची पद्धत आणि आवड पाहून अमेरिकेच्या प्रसिद्ध कंपनीत त्याची निवड झाली असून, तो त्या ठिकाणी कामावर रुजू झाल्याने गावातील मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारी विधवा आई, भाऊ यांना यावेळी आनंदाश्रू डोळ्यात तरंगत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर गावातील मित्रपरिवार यांनी गावात त्याच्या यशाबद्दल सर्वत्र जल्लोष करीत आनंद साजरा केला. त्याच्या या शैक्षणिक प्रवास व यशामध्ये त्याचे मोठे बंधू मनोहर पाटील, विधवा आई यांचा खूप मोठा वाटा आहे.

मोठे बंधू हे देखील नामांकित कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहेत. योगेश मुंबई विमानतळावरून अमेरिका वॉशिंग्टनसाठी रवाना होताच, मित्र परिवार व ग्रामस्थांच्या मोबाईल स्टेटसवर ‘कळमसरे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा’ असे संदेश प्रत्येकाच्या मोबाईलवर दिसून आला.

एक सर्वसामान्य कुटुंबातील मोलमजुरी करणाऱ्या विधवा आईच्या मुलाने उच्चशिक्षित घेऊन विदेशात जाण्याचे स्वप्न परिवारासोबत गावाचेही नाव लौकिक वाढविल्याची भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

SCROLL FOR NEXT