Dr. along with the patient who underwent surgery. Nilesh Chandak, other doctors and relatives of the patient.  esakal
जळगाव

Jalgaon News : 100 वर्षीय कर्करोगग्रस्त आजीवर शस्त्रक्रिया; डॉ नीलेश चांडक यांचा प्रचंड आत्मविश्‍वास आला कामी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आपला आजार डॉक्टरच बरा करू शकतील, अशी आशा असलेल्या जळगावमधील शंभरवर्षीय आजीवर यशस्वी स्तनाच्या कर्करोगची शस्त्रक्रिया करून तिला व्याधीमुक्त करण्याचा विक्रम जळगाव येथील कर्करोगतज्ज्ञ डॉ. नीलेश चांडक यांनी केला आहे.

विशेष म्हणजे स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर या आजी दुसऱ्याच दिवशी चालत घरी परतल्या आहेत. डॉ. चांडक यांची शस्त्रक्रिया यशस्वी होईलच, असा दुर्दम्य आशावाद याकामी आला आहे. (Successful breast cancer surgery on 100 year old cancer grandmother jalgaon news)

स्तनात दुखत असल्याने १०० वर्षीय आजी नातेवाइकांसोबत डॉ. चांडक यांच्या रुग्णालयात आल्या. त्या वेळी कर्करोगाचा तो पहिला टप्पा होता. यापूर्वी त्या जेथे गेल्या, तेथून त्यांना एवढ्या वयात शस्त्रक्रिया करता येणार नाही, असे सांगत परत पाठविले गेले.

मात्र डॉ. चांडक यांनी हे आव्हान स्वीकारले. आजीबाईला स्तनासमवेत कपाळावरही गाठ होती. पण रुग्णाचे स्वतःचे म्हणणे होते, की कपाळावरील गाठ लहानपणापासून आहे. परंतु स्तनातील गाठ ही महिन्याभरातच आली आहे. त्याच गाठीचा उपचार करण्याची तिची मानसिकता होती.

जाणीवपूर्वक गावखेड्यातील वयस्क रुग्णाची उपचारासाठी मानसिकता पहिल्यांदाच पाहिल्याचे डॉ. चांडक यांनी सांगितले. त्याच सकारात्मक मानसिकतेमुळे आमच्या टीममधील डॉक्टरांचेसुद्धा मनोधैर्य वाढले. त्यातून रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊ शकली, असे डॉक्टरांनी सांगितले. पाऊण तासाच्या शस्त्रक्रियेनंतर वृद्धा शुद्धीवर आली.

तासाभराच्या जटिल शस्त्रक्रियेनंतर ही वयस्क रुग्ण लगेच शुद्धीवर येणे, दोन-चार तासांत खाणे-पिणे सुरू होणे, दुसऱ्याच दिवसापासून वेदनाशामक गोळ्यांव्यतिरिक्त एकही गोळी किंवा सलाइन नाही, ड्रेसिंग नाही, छातीवरून अंघोळ करण्याची मुभा हे सगळे जळगावसारख्या डॉ. चांडक यांच्या रुग्णालयात शक्य होत आहे.

भूलतज्ज्ञांची साथही मोलाची

वयाची शंभरी पार केलेल्या आजीला भूल देणे म्हणजे तो रुग्ण शुद्धीवर येण्याची शक्यता कमी असते. मात्र एवढे वय असूनही महिला शस्त्रक्रियेनंतर १५ मिनिटातच ती शुद्धीवर आली. त्यामुळे डॉ. नीलेश चांडक यांनी या यशाचे श्रेय भूलतज्ज्ञ डॉ. सागर व्यास यांनाही दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"इतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास वयाचे कारण देत नकार दिला होता. डॉ. नीलेश चांडक यांनी आत्मविश्‍वासाने आजीची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर पंधरा मिनिटांत त्या शुद्धीवर आल्या. आता आजी एकदम ‘ओके’ आहेत." - भरत हटकर, रुग्णाचे नातेवाईक फुलसर (ता.पारोळा, जि.जळगाव)

"या वृद्ध महिलेला ट्रिपल निगेटिव्ह प्रकारचा कॅन्सर असल्याने कॅन्सरचा उपचार गोळ्यांच्या माध्यमाने शक्य नव्हता व शस्त्रक्रिया हाच सर्वोत्तम पर्याय होता. रुग्णासोबत चर्चा केल्यानंतर रुग्ण व नातेवाइकांची शस्त्रक्रियेसाठी सकारात्मक तयारी दर्शविली म्हणून हे आव्हान स्वीकारले.

आमच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखविली. स्तन पूर्णतः काढून शस्त्रक्रिया पार पडली व रुग्णाला एकाच दिवसात हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले." - डॉ. नीलेश चांडक, कर्करोगतज्ज्ञ, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कामासाठी इमारतीमध्ये गेले; पण कुत्रा मागे लागला अन्...; सारंच संपलं! पुण्यात 'त्या' इलेक्ट्रिशियनसोबत काय घडलं?

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Latest Marathi News Update LIVE : अनिल देशमुखांच्या मुलाचा शरद पवार गटाला रामराम

Pune Municipal Election : पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार! १० प्रभागातील मतदार संख्या लाखाच्या पुढे, प्रचारात उमेदवारांची होणार दमछाक

SCROLL FOR NEXT