Laxman Manik Wadle esakal
जळगाव

Jalgaon Accident News : दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात टँकरचालकाचा मृत्यू

वराड बुद्रुक (ता. धरणगाव) गावातील बसस्थानकासमोर वाहनाला वाचविण्याचा प्रयत्नात पेट्रोल टँकरच्या अपघातात चालकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ३०) घडली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : वराड बुद्रुक (ता. धरणगाव) गावातील बसस्थानकासमोर वाहनाला वाचविण्याचा प्रयत्नात पेट्रोल टँकरच्या अपघातात चालकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ३०) घडली.

धरणगाव पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.(Tanker driver dies while trying to save two wheeler jalgaon accident news)

धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक येथे लक्ष्मण माणिक वाडले (वय ५२) पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. टँकरचालक म्हणून ते काम करत होते. शनिवारी वराड बुद्रुक गावातील बसस्थानकासमोरून ते जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचा टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर थेट नाल्यावरील पुलावरील कठड्यावर धडकला.

अपघातात चालक लक्ष्मण वाडले गंभीररीत्या जखमी झाले. अपघात होताच ग्रामस्थांनी लक्ष्मण वाडले यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. ग्रामस्थ व नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. लक्ष्मण वाडले यांच्या मागे पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी, आई आणि भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT