Rohan Patil, Bhagwat Patil, Haroon Deshmukh etc. while inaugurating the tanker. esakal
जळगाव

Jalgaon News : दशक्रिया विधीच्या पैशातून गावाला टँकर; पाटील कुटुंबाचे दातृत्व आदर्शवत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गावासह परिसरात उन्हाळ्यात ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यासाठी गावातील लोकांना मोफत जलसेवा घडावी, यासाठी वडिलांच्या दशक्रिया विधीच्या पैशातून येथील पाटील कुटुंबीयांनी स्वखर्चाने टँकर उपलब्ध करून दिला.( Tanker to village from money of Dasakriya ritual jalgaon news)

येथील भिकन कौतिक पाटील यांचे गेल्या रविवारी (ता.८) निधन झाले. गंधमुक्तीचा कार्यक्रम मंगळवारी (ता. १७) होता.

या कार्यक्रमात वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ गावातील लोकांना जलसेवा मोफत उपलब्ध व्हावी म्हणून एरंडोल पंचायत समितीचे माजी सदस्य तथा उत्राण अहिरहद्दचे सरपंच भागवत पाटील व त्यांच्या परिवाराच्यावतीने माजी पालकमंत्री सतीश (अण्णा) पाटील यांचे पुत्र जिल्हापरिषद सदस्य रोहन पाटील गावाचे प्रभारी सरपंच हारून देशमुख यांच्या हस्ते पाण्याच्या टँकरचे लोकार्पण करून पंचायतीस सुपूर्त करण्यात आले.

त्यावेळी बाजार समितीचे माजी संचालक आनंदा धनगर, गुजरहद्दचे प्रभारी सरपंच वाल्मीक ठाकरे, चंद्रकांत वाघ, जितू महाले, गौतम खैरनार, दिनेश आमले, सर्व पाटील परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT