Flyover near Paladhi Bypass
Flyover near Paladhi Bypass esakal
जळगाव

Jalgaon News : तरसोद-पाळधी बायपासमुळे वाहतुकीचा भार होणार कमी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पाळधी ते तरसोददरम्यान बायपास मार्गाचे चौपदरीकरणास वेग आला आहे. येत्या जूनपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. बायपास पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहतूक बायपासमार्गे वळविण्यात येणार आहे. यामुळे शहरातील महामार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी होऊन अपघाताच्या प्रमाणात घट होईल, अशी आशा आहे.

शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण झाल्यानंतरही शहरातील महामार्गावर अपघाताचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. रात्री शहरातील महामार्गावर पथदीप नाहीत. रात्री अंधार असतो. (Tarsod Paldhi Bypass reduce traffic load Accelerating quadrilateral ization works Bypass work be completed by July Jalgaon News)

अवजड वाहतूक या मार्गावर अधिक प्रमाणात होते. अवजड वाहतूक करणारे भरधाव वेगाने वाहने चालवितात. यामुळे वाहनापुढे दुसरे वाहन आल्यास वाहनावर अचानक नियंत्रण करणे कठीण जाते. यामुळे अपघातात होतात. तरसोद ते फागणेदरम्यान महामार्गाच्या चौपदरणाला या वर्षी वेग आला आहे. कोरोनामुळे दोन वर्षे काम काहीवेळ बंद होते. नंतर अतिशय संथ गतीने सुरू झाले. गेल्या सहा महिन्यांपासून या कामाला वेग आला आहे.

पाळधी ते तरसोद या २३ किलोमीटरच्या कामाला नोव्हेंबर २०२० पासून सुरवात झाली. तब्बल दोन वर्षांपासून हे काम रखडले होते. या राष्ट्रीय महामार्ग बायपासच्या मार्गावर अनेक लहान मोठे गावे येतात. त्यात तरसोद, असोदा, भोकणी, आव्हाणे, मुमुराबाद, जळगाव शिवार, पाळधी आदी गावांचा समावेश आहे.

बायपासची एकूण लांबी २३ किलोमीटर आहे. बायपास अंतर्गत सहा ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात येत आहेत. त्यांची कामे वेगाने सुरू झाली आहेत. गिरणा नदीवरील तीनशे मीटरच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जुलैपर्यंत बायपास पूर्ण होऊन वाहतूक सुरू होईल, असे महामार्गाच्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

तरसोदजवळ सर्व्हिस रोड तयार

बायपासच्या इतर ठिकाणी महामार्गासाठी भराव टाकण्याच काम पूर्णत्वाकडे आहे. ज्या ठिकाणावरून बायपास वळतो. त्या तरसोद फाट्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड आहे. भुसावळकडून जळगावकडे येणारा सर्व्हिस रोड तयार झाला आहे. आता जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या सर्व्हिस रेाडचे काम सुरू आहे. तेही लवकरच पूर्ण होईल, त्यावरून वाहतूक सुरू होईल.

जमिनींना कोट्यांवधीचे दर

राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास आव्हाणे शिवारतून जातो. यामुळे तेथील जमिनींना कोट्यावधींचा भाव मिळाला आहे. पाळधी, भोकणी, आव्हाणे, मुमुराबाद, जळगाव शिवार, असोदा या भागातील काही जमिनींना एका वर्षांपूर्वी दोन ते चार लाखांचा दर होता. आता तो दर ८० लाख ते एक कोटीपर्यंत गेला आहे. अनेक ठिकाणी हॉटेल्स, बिअर बार, लॅानसाठी, पेट्रोलपंपासाठी जागा खरेदी केल्या जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT