Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : सावखेडा येथे दहा हजारांची देशी व गावठी दारु नष्ट; अमळनेर पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : तालुक्यातील सावखेडा येथे पोलिसांनी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे साडेदहा हजार रुपयांची देशी व गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली असून, तीन जणांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावखेडा (ता.अमळनेर) येथे देशी व गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती.त्यानुसार पोलिस पथकाने सावखेडा येथील वैदूवाडा भागात राहणाऱ्या बाबू मारुती वैदू (वय ५४) हा घराच्या आडोश्याला दारुविक्री करताना आढळून आला. (Ten Thousand worth of local and village liquor destroyed in Savkheda Amalner police action Jalgaon News)

हेही वाचा :'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

सुमारे एक हजार रुपयांची गावठी दारू त्याच्याकडून जप्त करण्यात आली. तर त्याच भागात राहणारा रतन मल्लू वैदू (वय ४८) हा झाडाझुडुपांमध्ये विना परवानगी देशी दारूच्या बाटल्या बाळगून विक्री करताना आढळून आला असून, त्याच्याकडून ६ हजार १६० रुपयांच्या ८८ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

तर १ हजार ४०० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे. तसेच भिका मारुती वैदू (वय ६५) यांच्याकडे देखील छापा टाकून १४०० रुपयांची ३५ लिटर दारू नष्ट करण्यात आली. अमळनेर पोलिसांनी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे १० हजार १६० रुपयांची देशी व गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोलिस कर्मचारी संदेश पाटील, सुनील जाधव, महिला पोलिस कर्मचारी नजिमा पिंजारी आदींच्या पथकाने केली असून, दोन्ही जणांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT