Jalgaon: Police Inspector Jaipal Hire while giving information about the seized flag esakal
जळगाव

Jalgaon News : दर्ग्यावरील झेंड्यावरून विटनेरमध्ये तणाव

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विटनेर (ता. जळगाव) येथील दर्ग्यावर पाकिस्तानी झेंडा लावल्याच्या गैरसमजातून संप्त ग्रामस्थांनी दर्ग्यावरील सेवेकऱ्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. एमआयडीसी पोलिसांच्या चौकशीत हा झेंडा पाकिस्तानचा नसून धार्मिक म्हणून लावल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तो झेंडा जप्त केला आहे.

विटनेर गावाजवळील दर्ग्यावर पाकिस्तानचा झेंडा लावल्याची माहिती विटनेर ग्रामस्थांसह पोलिसपाटलांना मिळाली. त्यावरून ग्रामस्थ आणि पोलिसपाटलांनी घटनास्थळ गाठून तो झेंडा काढून घेतला व दर्ग्यावरील व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केले.

त्या व्यक्तीवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र, पाकिस्तानचा झेंडा नसल्याचे पोलिस चौकशीत समोर आले. (Tension in Winter from flag on shrine Devotees of Jamner in custody Police confiscated flag Jalgaon News )

ग्रामस्थांशी पोलिसांचा संवाद

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी विटनेर ग्रामस्थांशी संवाद साधत प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले व झेंड्याबाबत गैरसमज दूर केला. झेंड्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी झेंडा ताब्यात घेतला आहे. तर दर्ग्यावरील व्यक्तीला समज दिली आहे.

अन्‌ बाबा आले स्वप्नात

एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या तपासात जामनेर येथील गोपाळ सुपडू कहार यांनी हा झेंडा लावल्याचे समोर आले. पोलिसांनी गोपाळ कहार यांची चौकशी केल्यावर ‘बाबा माझ्या स्वप्नात आले होते, म्हणून मी श्रद्धेतून तो झेंडा लावला, पण तो पाकिस्तानचा झेंडा आहे किंवा नाही मला माहिती नाही’, असे गोपाळ कहार यांनी सांगितले.

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई

विटनेर गावात पाकिस्तानी झेंडा लावल्याच्या काही पोस्ट, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. ते सत्य नसून तो फक्त हिरवा आणि पांढऱ्या रंगाचा झेंडा आहे. तो पाकिस्तानचा झेंडा नाही. कुणीही अशा पोस्ट व्हायरल करू नये आणि अफवा पसरवू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस निरीक्षक हिरे यांनी दिला आहे.

"त्या झेंड्याचे प्रत्यक्षात स्वरूप पाहिले असता, त्या झेंड्याला सफेद किनार आहे. अशी कुठलीही सफेद किनार पाकिस्तानच्या झेंड्याला नाही. त्यामुळे तो पाकिस्तानचा झेंडा आहे, असे म्हणता येणार नाही."

-जयपाल हिरे, पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT