Baby
Baby esakal
जळगाव

जळगाव : महिलेने शेतातच दिला जुळ्यांना जन्म

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : उखडवाडी (ता. धरणगाव) येथे एका शेतात असताना अचानक गर्भवती महिलेला कळा सुरू झाल्या. ग्रामीण भाग असल्याने कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली. मात्र दवाखान्यात पोचण्यापूर्वीच महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. रात्रीची बिकट वेळ असतानाही महिलेने सुखरुप चक्क जुळ्या बाळांना जन्म दिला. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रसंगातून अतिरक्तस्राव होऊनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या परिश्रमानंतर त्या महिलेला वाचविण्यात यश आले आहे.

केवलबाई भिल (वय २६, रा. उखडवाडी, ता. धरणगाव) असे या महिलेचे नाव आहे. त्यांचे कुटुंब मजुरी करते. या महिलेची प्रसूतीची ही चक्क पाचवी वेळ होती. यापूर्वी २ मुली व २ मुले तिला आहेत. पाचव्या प्रसूतीमध्ये तिला दोन्ही मुली झाल्या आहेत. ५ जानेवारी रोजी कुटुंबीयांसह शेतात असताना केवलबाईला प्रसूतीकळा सुरू झाल्या. कुटुंबीय वाहन आणतील तत्पूर्वीच महिलेची प्रसूती सुरू झाली. शेतातच सदर महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र प्रसूतीमुळे महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक होऊन बेशुद्ध झाली. कुटुंबीयांनी थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिला रात्री नउ वाजता दाखल केले. महिलेचे हृदयाचे ठोकेदेखील लागत नव्हते. खूप रक्तस्राव झाल्याने प्रकृती चिंताजनक होती. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे, सहयोगी प्रा. डॉ. नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जितेंद्र कोळी, डॉ. कांचन चव्हाण यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून महिलेचा जीव वाचविण्यासाठी गर्भपिशवी काढली. यामुळे महिलेचा जीव वाचला.

चार दिवस अतिदक्षता विभागात

महिलेला ६ रक्ताच्या पिशव्या, २ पांढऱ्या पेशींच्या थैल्या लावण्यात आल्या. चार दिवस अतिदक्षता विभागात उपचार केल्यानंतर रविवारी (ता. ९) जनरल कक्षात या महिलेला वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली ठेवले आहे. उपचार करण्यासाठी डॉ. शलाका पाटील, डॉ. सोनाली मुपाडे, डॉ. चंदन महाजन, डॉ. राजश्री येसगे, डॉ. विनेश पावरा, डॉ. हर्षद, डॉ. स्वप्नील इंकने, परिचारिका सोनाली पाटील, राजश्री आढाळे यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT