Crime
Crime Sakal
जळगाव

Jalgaon Crime News : राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलकाचीच चोरी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राष्ट्रीय महामार्गाच्या दिशादर्शक फलकाची चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी फुलगाव येथील तीन संशयितांना अटक केली आहे तर एक जण फरार झाला आहे. ( Theft of Directional Sign board on National Highway jalgaon news )

फुलगावजवळील चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जोगेश्वरीजवळ सोमवारी (ता. २९) मध्यरात्री अडीचच्या सुमारास वाहनधारकांच्या सुविधांसाठी लोखंडी धातूचे दिशादर्शक फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

मात्र चोरट्यांनी संधीचा फायदा घेऊन चोरी करून नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गस्तीवर असलेले महामार्ग कर्मचारी श्रीकांत बोडरे, अमर परदेशी, सलीम बेग यांच्या ही घटना निदर्शनास आल्याने त्यांनी वरिष्ठांपर्यंत माहिती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा अधिकारी शोएब शेख यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली असता वरणगाव पोलिसांनी या घटनेत तत्काळ मागोवा घेतला असता ट्रॅक्टरमध्ये (एमएच १९, डीवाय ४०६८) चोरी करून नेत असताना मुकेश अरुण सोनवणे (वय ३५),

तुषार राजेंद्र शिंदे (वय ३२), गौरव दिलीप देवगिरे हे आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली तर सय्यद रोशन सय्यद ताहेर हा फरार झाला असून, सर्व फुलगाव येथील रहिवासी आहेत. संशयितांनी फलक चोरी केल्याची कबुली दिली असून वरणगाव पोलिस तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid-19: 'तो' पुन्हा येतोय ? कोरोनाच्या नव्या प्रकाराने वाढवली डोकेदुखी; या देशात पुन्हा मास्क घालण्याचे आवाहन

HSC Result : बारावीत नापास झालाय? टेन्शन नॉट! हे कोर्स ठरू शकतात लाईफ चेंजर

Latur 12th Exam Result : लातूर विभागाचा पॅटर्नचं वेगळा! यंदाही मुली ठरल्या अव्वल, विभागाचा 92.36 टक्के निकाल

Latest Marathi News Live Update: जॅकी श्रॉफचे 'सिंगम अगेन'साठी काश्मीरमध्ये शुटिंग, म्हणाला...

India Head Coach : BCCIसाठी थाला ठरणार मांडवली बादशाह? भारताच्या नव्या कोचच्या निवडीसाठी वापरणार धोनी फॅक्टर

SCROLL FOR NEXT