crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बसमध्ये चढतांना पर्समधून ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : चोपडा येथील ब्युटीपार्लर संचालिका आज साहित्य खरेदीसाठी जळगावी आल्या होत्या. माल खरेदीनंतर चोपडा येथे जाण्यासाठी बसमध्ये चढतांना संगीता रवींद्र राणे यांच्या पर्समधील सोन्याची पेात, मोबाईलसह १७ हजार रुपये रोख असा ५० हजार ७०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लांबविला. ( theft of purse and cash while boarding bus jalgaon crime news )

आज दुपारी ही घटना घडली. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा येथील रहिवासी संगीता राणे ब्युटीपार्लर चालवून कुटुंबाला हातभार लावतात.

ब्युटी पार्लरसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी त्या आज (ता. ४) चोपड्याहुन जळगावी आल्या होत्या.

साहित्य खरेदीनंतर दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास त्या शिवाजीनगर उड्डाणपुलापासून चोपडा बसमध्ये चढत असताना हातातील मोठ्या बॅगमध्ये ठेवलेल्या पर्समधून ४५ हजार रुपये किमतीची मंगलपोत, ४ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि सतरा हजार रुपये रोख असा एकूण ५० हजार ७०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेला.

घडला प्रकार लक्षात आल्यानंतर राणे यांनी शहर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT