Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बंद घरातून 60 हजार रुपयांची चोरी

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : येथील अमळनेर रस्त्यावरील अशोक नगर भागात बंद घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत सोने लंपास केले. भोकरबारी (ता. पारोळा) येथे देखील चोरट्यांनी हातसफाई केल्याने चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ सुरु झाल्याने पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

अशोक नगरातील रहिवासी समाधान बापू भवर (मराठे) हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ९ ते १० जानेवारीच्या दरम्यान चोरट्याने त्यांच्या बंद घराचा फायदा घेत, घराच्या दाराचा कडी कोयंडा तोडून लोखंडी कपाटातील ४५ हजार रुपये किमतीचे साडेचार ग्रॅम सोन्याचा हार, १५ हजारांचे सोन्याचे टोंगल असा सुमारे ६० हजारांचा ऐवज चोरुन नेला. (Theft of Sixty thousand rupees from a closed house Jalgaon News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

या भागात विजेचे दिवे सुरु असतानाही ही चोरी झाल्याने रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट देऊन पाहणी केली. कॉलनीतील रहिवाशांनी लोकसहभागातून ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, चोरीच्या या घटनेप्रकरणी समाधान भवर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोकरबारी (ता. पारोळा) येथे देखील चोरट्यांनी एका घरात चोरी केल्याची घटना घडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT