There is no defaulter in PM svanidhi loan scheme in jalgaon news esakal
जळगाव

PM Swanidhi Yojana: रस्त्यावरील विक्रेत्यांकडून छोट्या कर्जफेडीतून धडा; पीएम कर्ज योजनेत एकही थकबाकीदार नाही

सकाळ वृत्तसेवा

PM Swanidhi Yojana : श्रीमंत उद्योजक मोठमोठ्या कर्जांसाठी हमी देऊनही बँकांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पलायन करतात. परंतु रस्त्यावरचा सर्वसाधारण व्यावसायिक कोणतीही हमी न घेता कर्ज घेतो, नियमीत कर्जफेड करून आपली पत वाढवून अधिक कर्ज घेत असल्याचे जळगाव महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान स्वनिधी कर्ज योजनेतून दिसून आले आहे.

केंद्र शासनातर्फे पीएम स्वनिधी योजना म्हणजेच पंतप्रधान स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी योजना १ जून २०२०पासून सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत रस्त्यावर भाजीपाला, स्टेशनरी, इतर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना अत्यंत छोटी कर्जे दिली जातात.

लाभार्थ्यांना दहा हजार, वीस हजार आणि ५० हजार रूपये असे तीन टप्प्यात कर्ज मिळते. (There is no defaulter in PM svanidhi loan scheme in jalgaon news)

संबंधीत व्यावसायिकाचे ज्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते असेल, त्यामार्फत हे कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे यात बँकेला कोणत्याही प्रकारची हमी द्यावी लागत नाही. कागदपत्रांचे कोणतेही जंजाळ नाही. बँकेचे अधिकारी जागेवर जावून व्यवसायाची खात्री करतात आणि पहिल्या टप्यात त्या व्यवसायिकाला दहा हजार रूपये कर्ज मिळते.

एक हजार रूपये प्रतिमाहप्रमाणे याची कर्जफेड असते. हे कर्ज फेडल्यानंतर व्यावसायिकास पुढील टप्प्यात वीस हजार रूपये व त्यापुढील टप्प्यात ५० हजार रूपयापर्यंत कर्ज मिळते. शहरात महापालिकेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येते. महापालिकेच्या महिला बालकल्याण विभागांतर्गत असलेल्या या योजनेचे कार्यालय महापालिकेच्या सतरा मजली इमारतीत सहाव्या मजल्यावर आहे.

विक्रेत्यांचा चांगला प्रसिसाद

महापालिकेच्या या विभागातून माहिती घेतली असता, ३१ डिसेंबर २०२४पर्यंत नऊ हजार दोनशे जणांना कर्ज वाटप करण्याचे उदिष्ट देण्यात आल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत ६ हजार ९६० जणांना कर्ज वितरीत करण्यात आले आहे. दहा हजाराची कर्जफेड करून वीस हजार रूपये कर्ज घेणारे ९४३ जण, तर २० हजाराची कर्जफेड करून ५० हजार रूपये कर्ज घेणारे २२५ जण आहेत. आतापर्यंत उद्दिष्टापेक्षा अधिक, म्हणजे तब्बल दहा हजार अर्ज आले असल्याचेही सांगण्यात आले.

आणखी काही जण प्रतिक्षेत

तीन वर्षापासून सुरू असलेल्या या योजनेत कर्ज घेणाऱ्यांनी नियमीतपणे कर्ज फेडल्याचे दिसून आले आहे. यात एकही डिफॉल्टर आढळून आलेला नाही. काही जणांचे अडचणीमुळे हप्ते चुकले, मात्र काउन्सीलींगनंतर त्यांनी ही रक्कम भरली असल्याचेही सांगण्यात आले. शहरातील भाजीपाला विक्रेते, खाद्यपदार्थ, तसेच स्टेशनरी विक्रेत्यांनीही या योजनेचा लाभ घेतला असून, अजूनही काही जण प्रतिक्षेत आहेत.

आता बचत गटातील महिलांनाही लाभ

या योजनेत आता बचत गटातील महिलांनाही लाभ मिळणार आहे. महिला ज्या बचत गटात असतील त्यांनी त्या गटाद्वारे अर्ज केल्यानंतर ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेमार्फत व्यवसायासाठी वैयक्तीक कर्ज देण्यात येत आहे.

"पंतप्रधान स्वनीधी योजनेतून कर्ज घेतले आहे. त्याचा व्यवसायासाठी आधार झाला आहे. आपण त्याची नियमीत फेड करीत आहोत." -झाकीर हुसेन, इलेक्ट्रीक व्यवसाय

"जळगाव शहरात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत डिफॉल्टर असल्याबाबत बँकेतर्फे एकही पत्र आलेले नाही. या योजनेंतर्गत व्यवसायिक नियमीत कर्जफेड करून नवीन लाभही घेत आहेत." -गायत्री पाटील-महाले, अधिक्षक, पीएम स्वनिधी योजना, महापालिका, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून मओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

Ravi Sharma: शंभर कोटींचा टर्नओव्हर सांगणारे रवी शर्मा नेमके कोण? 6 लाखांची जीएसटी अन् रोल्स रॉयसचं स्वप्न

महाठग सापडला! रत्नागिरीतील तरुण मुंबईत आला, जीवनसाथी ॲपवर अविवाहित ‘पीएसआय’ असल्याची नोंदणी केली, ५० ते ६० मुला-मुलींशी संपर्क, फोनवर बोलायचा अन्‌...

Latest Marathi News Live Update: पोलिसाची गाडी बेकाबू, प्रवाशी रिक्षासह दोन दुचाकींना उडवले

SCROLL FOR NEXT