Thief esakal
जळगाव

परप्रांतीय विक्रेत्याचा गोरखधंदा उघड

- रईस शेख

जळगाव : शहरातील एका पाणीपुरी विक्रेत्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दिवसा पाणीपुरी विक्रीची गाडी लावणारा हा भामटा रात्री वेगवेगळ्या परिसरातून वाहने लंपास करीत असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून असंख्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहरात दिवसाला तीन दुचाी चोरी होत असल्याने पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली होती. प्रत्येक गुन्हेगारावर पाळत ठेवूनही चोरटे सापडत नसल्याने अखेर गुप्त बातमीदार पेरून माहिती घेण्यात आली. दिवसा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एकावर संशय असल्याने काही दिवस त्याच्यावर खबऱ्याने पाळत ठेवली.

चार दुचाकी चोरी

संशयास्पद हालचाली आढळून आल्याने गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, युनूस शेख, राजेश मेंढे, संजय हिवरकर, संतोष मायकल, ईश्वर पाटील, हेमंत पाटील यांच्या पथकाने पाणीपुरी विक्रेता मनीष ऊर्फ मायाराम जनरलसिंग यादव (मूळ रा. ग्वालियर, ह. मु. जळगाव) याला पाणीपुरी विकता असताना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यात शहर पोलिस ठाणे, जिल्‍हापेठ आदी हद्दीतून चार दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून वाहने जप्त करण्यात आली आहेत.

दिवसा पाणीपुरी अन्...
अटकेतील मनीष ऊर्फ मायाराम यादव हा दुपारी पाणीपुरी विक्रीची गाडी लावतो. तत्पूर्वी सकाळी आणि रात्री दहानंतर तो शहरातील विविध भागातून दुचाकी चोरून पळ काढत होता. त्याच्याविरुद्ध ग्वालियर येथेही असंख्य गुन्हे दाखल असून, तो तेथील रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thar Accident सोमवारी पुण्याहून कोकणात जायला निघाले, गुरुवारी ताम्हिणी घाटातल्या दरीत थारसह ६ मृतदेह दिसले; कधी आणि काय घडलं?

भारतीय जवानाचं शिरच्छेद करून मुशर्रफसमोर ठेवलं, काय आहे किस्सा? ‘धुरंदर’मध्ये अर्जुन रामपाल साकारणार त्या राक्षसाचा चेहरा

Chief Minister Security : कोणत्या मुख्यमंत्र्यांना आहे जबरदस्त सुरक्षा कवच अन् जाणून घ्या, नितीश कुमारांची सुरक्षा कशी?

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात मोटार खोल दरीत कोसळली, चार मृतदेह हाती; मृतांची नावे समोर, सर्वजण पुण्यातील

Latest Marathi News Update LIVE : पुण्यात १ लाख रुपयांचा नायलॉन मांजा जप्त

SCROLL FOR NEXT