crime news  esakal
जळगाव

Jalgaon News : कुटुंबीय अंत्यविधीला, घरात चोरट्यांची ‘जत्रा’; ‘शेंबड्या’सह दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : औद्योगिक वसाहत परिसरातील सुप्रीम कॉलनी, जकेरियानगरात शुक्रवारी (ता. २१) रात्री चोरट्यांनी घर फोडून एक लाख ९२ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर तीन दिवसांत दोघा भामट्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. (Thieves stole 1 lakh 92 thousand jalgaon news)

सुप्रीम कॉलनीत जकारियानगरातील मन्नत बंगल्याच्या पाठीमागे मोहम्मद आवेश अब्दुल सत्तार (वय २३) हा तरुण कुटुंबीयांसह वास्तव्यास असून, तो महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. आवेश याच्या आजीचे निधन झाल्याने त्यांना मामाकडे जावे लागले. सायंकाळी मोहम्मद आवेश घरी परतल्यावर त्याला घराच्या मुख्य दाराचा कडीकोयंडा तुटलेला व घरात सर्वत्र सामान अस्थाव्यस्थ फेकून कपाट उघडे आढळून आले.

त्यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाच्या तिजोरीतून एक लाख ९२ हजार रुपये किमतीचे सोने- चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज चोरीला गेल्याचे आढळून आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

संशयितांची टीप मिळाली

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसीच्या गुन्हे शोध पथकाला संशयितांची गुप्त माहिती मिळाली. रेकॉर्डवरील मोहसीन खान नूरखान ऊर्फ शेंबड्या याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची शंका आहे. त्या आधारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, इम्रान सय्यद, सुधीर सावळे, सचिन पाटील, योगेश बारी, मुद्दस्सर काझी, साईनाथ मुंडे या पथकाने अधिक माहितीचे संकलन करण्यास सुरवात केली.

गुन्ह्यातील अल्पवयीन संशयितांस ताब्यात घेतल्यावर त्याने कबुली देताच मोहसीन खान नूरखान ऊर्फ शेंबड्या (वय २६, रा. गेंदालाल मिल) त्याचा साथीदार इस्माईल ऊर्फ राजू शेख शब्बीर (वय ४६, रा. गणेशपुरी, मेहरुण) या दोघांना ताब्यात घेत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत ९५ हजार रुपयांचा ऐवज काढून दिला आहे. दोघांना न्यायालयात हजर केल्यावर न्या. जे. एस. केळकर यांच्या न्यायालयाने संशयितांना बुधवार (ता. २६)पर्यंत पेालिस कोठडीचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे ॲड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI Credit Card: SBI क्रेडिट कार्ड वापरताय? 1 तारखेपासून नियम बदलणार; कोणते फायदे मिळणार नाहीत?

Latest Marathi News Updates: फडणवीस वाकड्यात घुसतात, म्हणून मी असं बोलतो – मनोज जरांगे

Hartalika Vrat 2025 Puja Samagri: अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रत; पूजेसाठी लागणारे साहित्य व विधीची संपूर्ण माहिती वाचा एकाच क्लिकवर!

Dada Bhuse : महायुतीचा निर्णय शिंदे घेतील; पण आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा: दादा भुसे

Pune Airport : विमानाच्या खिडकीचे आतील आवरण निघाले; पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानातील घटना

SCROLL FOR NEXT