Thieves stole silver pieces from Shree Lakshmi Gold House jewellers shop jalgaon news
Thieves stole silver pieces from Shree Lakshmi Gold House jewellers shop jalgaon news 
जळगाव

Jalgaon Crime News: जळगावमध्ये भरवस्तीत ज्वेलर्स दुकान फोडले; चांदीचे तुकडे लांबविले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील नवी पेठेच्या भरवस्तीत बँका असलेल्या भागात चोरट्यांनी श्री लक्ष्मी गोल्डन हाउस ज्वेलर्सचे दुकान फोडून चांदीचे तुकडे लांबविले. तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना यश आले नाही. भरवस्तीत झालेल्या चोरीमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

नवीपेठेतील भारत दुग्धालयाच्या व सारस्वत बँकेच्यासमोरील श्री लक्ष्मी गोल्डन हाउस हे जुने सोने-चांदीचे दुकान आहे. (Thieves stole silver pieces from Shree Lakshmi Gold House jewellers shop jalgaon news)

१९५८ मध्ये दुकानाची स्थापना झाली. हेमंत रूंगठा, त्रिलोक रूंगठा या दुकानाचे संचालक आहेत. याठिकाणी सोने-चांदीचे दागिने तयार केले जातात. रात्री दीड ते दोनच्या सुमारास चोरट्यांनी दुकान फोडले. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप आणि दरवाजाची लोखंडी पट्टी काढून आत प्रवेश करत पहिल्यांदा दुकानातील सीसीटीव्हीचे ‘कनेक्शन' तोडले.

त्यानंतर तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी चोरट्यांनी इथल्या अवजाराचा वापर केला. तिजोरी फोडण्यासाठी वापरण्यात आलेली अवजारे वाकलेल्या अवस्थेत आढळून आली. जुन्या काळातील तिजोरी असल्याने ती फोडण्यात चोरटे अयशस्वी झाले.

चोरट्यांनी दुकानातील चांदीचे तुकडे घेऊन पलायन केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

२९ हजार ३८८ रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक अनिल भावरी याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.

श्‍वान टॉवर चौकातून दुकानाकडे

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी श्‍वानाच्या माध्यमातून चोरट्यांचा तपास करण्याचा प्रयत्न केला. श्‍वान या गल्लीतून जळगाव मेडिकलकडून टॉवर चौकातील शर्मा दुग्धालयाकडून शेजारी भेळची गाडी उभी राहते, त्या गल्लीतून फिरून पुन्हा ज्वेलर्सच्या दुकानाजवळ आल्याचे सांगण्यात आले.

३ वर्षात दुसऱ्यांदा चोरी

भरवस्तीतील श्री लक्ष्मी गोल्डन हाउस ज्वेलर्स दुकानात तीन वर्षात दुसऱ्यांदा चोरी झाली आहे. हे दुकान फोडून त्यावेळी सोने, चांदीचे तुकडे चोरट्यांनी लांबविले होते. त्यावेळी चोरट्यांचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात आले. भरवस्तीत झालेल्या ज्वेलर्सच्या दुकानफोडीमुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान निर्माण केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT