thief esakal
जळगाव

कुटूंबीय झोपेत असतांना घरात चोरी

रईस शेख्

जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात एका घरातून चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १६ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. रामानंदनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात साजेदा रईस शेख (वय ४०) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. बुधवारी मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरात चोरट्यांनी शिरुन घरातील चांदीचे दागिणे, घड्याळ आणि रोकड असा एकूण १६ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

घरात चोरी झाल्याचा प्रकार पहाटे २ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. चोरट्यांचा शोधही घेतला मात्र, अपयश आल्याने अखेर साजेदा रईस शेख यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून बुधवारी सकाळी १०.३० वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संजय सपकाळे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT