esakal
जळगाव

HSC Result 2023 : नाशिक विभागात जळगाव जिल्‍हा अव्‍वल! उत्तीर्ण होणाऱ्यांत यंदाही मुलींचीच बाजी..

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (पुणे) फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता. २५) ऑनलाइन जाहीर झाला. (This year Jalgaon district is ranked first from Nashik division jalgaon news)

नाशिक विभागातून यंदा जळगाव जिल्‍हा विभागातून प्रथम क्रमांकावर आहे. नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.७७ टक्‍के लागला.

पुणे शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्राची परीक्षा फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आली. परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी दोनला ऑनलाइन जाहीर करण्यात आला. या निकालात नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश असून, नाशिक विभागातून यंदा जळगाव जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल लागला.

जळगाव अव्‍वल

नाशिक विभागातून सुमारे एक लाख ६३ हजार १० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी एक लाख ४७ हजार २५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात जळगाव जिल्‍ह्यातून ४७ हजार १०४ विद्यार्थी बसले होते. यापैकी ४३ हजार ७०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर धुळे जिल्ह्यातील २३ हजार ६८४ पैकी २१ हजार ७५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्‍केवारी ९१.८७ टक्‍के आहे, तसेच नंदुरबार जिल्‍ह्याचा ९२.६६ टक्‍के निकाल लागला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुलींनीच मारली बाजी

दरवर्षाप्रमाणे यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली. नाशिक विभागात उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींची टक्‍केवारी ९३.९० टक्‍के, तर मुलांची टक्‍केवारी ८८.५५ टक्‍के आहे. यात जळगाव जिल्‍ह्यातून मुली ९५.२० व मुले ९१.०२ टक्‍के आहेत. धुळे जिल्‍हा मुली ९४.२७ व मुले ९०.०७ टक्‍के आणि नंदुरबार जिल्‍हा मुली ९४.८४ आणि मुले ९०.९३ टक्‍के आहे.

नाशिक विभागाचा निकाल

जिल्हा...... प्रविष्ट विद्यार्थी...... उत्तीर्ण विद्यार्थी.......टक्केवारी

जळगाव.....४७ हजार १०४.....४३ हजार ७०१.....९२.७७

नंदुरबार......१६ हजार ६२५.....१५ हजार ४०६.....९२.६६

धुळे........ २३ हजार ९१२.....२१ हजार ७५९....९१.८७

नाशिक......७४ हजार ५९७....६६ हजार ३९०.....८८.९९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Court Attack: पुणे कोर्ट हल्ल्याप्रकरणी 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल; 15 जणांचा सहभाग असल्याचा संशय, तपासातून पुढे आली महत्त्वाची माहिती

Gokul Milk Union Case : गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षाला नवं वळण! शासन नियुक्त 4 संचालकांसह महायुतीच्या 8 संचालकांना कोर्टाची नोटीस; 3 डिसेंबरला सुनावणी

मुलं जेवताना नखरे करतात? जबरदस्ती न करता पौष्टिक खाण्याची सवय लावण्यासाठी पालकांनी काय करावं?

Latest Marathi News Live Update : पी. सी. जैन ज्वेलर्सचे मालक भरत जैन यांना पुन्हा धमकीचा मेसेज

Sharan Kumar Limbale : 'बेळगाव काय पाकिस्तानात आहे का?'; मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. लिंबाळे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सीमाभागात संताप

SCROLL FOR NEXT