Threat from son to father for educational institutions dispute jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शैक्षणिक संस्थेतील कामकाजावरून वाद; मुलाकडून वडिलांना मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : योगेश्वर माध्यमिक विद्यालय, सावखेडे तुर्क (ता. पारोळा) या संस्थेचे अध्यक्ष दयाराम पाटील व मुलगा अशोक दयाराम पाटील यांच्यात शैक्षणिक संस्थेतील कामकाजावरून वाद सुरू आहे.

या प्रकरणी संस्थाध्यक्ष तथा निवृत्त मुख्याध्यापक वडिलांच्या फिर्यादीवरून त्याच संस्थेत शिक्षक असलेल्या त्यांच्या मुलासह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दयाराम मोतीराम पाटील ऊर्फ डी. एम. पाटील (रा. विद्यानगर, कजगाव रोड, पारोळा) हे १९९६ पासून स्वामी विवेकानंद शैक्षणिक व बहुद्देशीय संचालित योगेश्वर माध्यमिक विद्यालय, सावखडे तुर्क (ता. पारोळा) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते १७ जूनला योगेश्वर माध्यमिक विद्यालयात कामानिमित्त गेले होते. (Threat from son to father for educational institutions dispute jalgaon crime news)

त्या वेळी मुलगा अशोक पाटील, चंद्रकांत साहेबराव पाटील, महेंद्र साहेबराव पाटील हे तीन जण शाळेच्या आवारात आले. यातील चंद्रकांत पाटील याने दयाराम पाटील यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नको, अशी सूचना दयाराम पाटील यांनी केल्यावर चंद्रकांत पाटील याला राग आला. त्यावेळी तो लाकडी फळी घेऊन दयाराम पाटील यांच्या अंगावर धावून आला.

शाळेतील शिक्षकांनी हे भांडण सोडविले. भांडण सोडविल्यावर दयाराम पाटील त्यांच्या वाहनाने घरी येण्यासाठी निघाले असता मुलगा अशोक याने गाडीची चाबी हिसकावत गाडी घेऊन गेला. त्या गाडीत संस्थेची शैक्षणिक कागदपत्रे व वाहनाची कागदपत्रे होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच, २० जुलैस सायंकाळी सहाच्या सुमारास दयाराम पाटील हे आपल्या निवासस्थानी असताना मुलगा अशोक हा घरी आला व दयाराम पाटील यांना शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी देऊन निघून गेल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली.

त्यावरून अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, महेंद्र पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी लवकर तपास करून मला न्याय द्यावा, अशी मागणी निवृत्त मुख्याध्यापक डी. एम. पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT