Deportation  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : रावेर तालूक्यात एकाच कुटुंबातील तिघे हद्दपार!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील रावेरमधील तिघा सख्य्या भावंडांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्‍हा पोलिस अधीक्षकांनी पारीत केले आहेत. जावेद शेख लुकमान (वय २७), सादीक शेख लुकमान (२३), सदाम शेख लुकमान (वय २०, सर्व रा. हत्तेहनगर, पाणी टाकीजवळ रावेर), असे तिघांची नावे आहेत. (Three from same family deported in Raver taluka Jalgaon Crime News)

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

रावेर पोलिस ठाण्याने पाठविलेल्या हद्दपार प्रस्ताव क्रमांक ६/२०२२ प्रमाणे जावेद शेख लुकमान, सादीक शेख लुकमान, सद्दाम शेख लुकमान यांच्याविरुद्ध दंगल घडविणे, दहशत माजवणे यांसह विविध गुन्हे दाखल असून, रावेर शहरात व शहराला लागून असलेल्या गावांत त्यांच्या टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यांना रावेर शहरात शांतता ठेवण्यासाठी त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही.

त्यांच्यामुळे जनतेच्या जीविताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण झाला आहे, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तिघांच्या वर्तनात सुधारणा व्हावी, यासाठी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी ता तिघांना सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT