Amalner: Police Inspector Vijay Shinde, Rakesh Singh Pardeshi, Nimba Shinde etc. while handing over the money to the woman. esakal
जळगाव

Jalgaon News : बसस्थानकावरील कर्तव्यावर असणाऱ्या पोलीसामुळे महिलेला परत मिळाले पावणे तीन लाख

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : बसस्थानकावरील सतर्क पोलिसामुळे एका महिलेचे बसमधील हरवलेले पावणे तीन लाख रुपये परत मिळाले आहेत.

चोपडा तालुक्यातील संगीता ताराचंद सोनवणे ही महिला नाशिक चोपडा बसमधून चोपड्याकडे जात होती. अमळनेर बसस्थानकावर पाणी पिण्यासाठी खाली उतरली. परत आल्यावर बॅग पाहिली असता तिला बॅग दिसली नाही.(Three lakh was return from woman by police on duty at the bus stand Jalgaon News)

तिने ताबडतोब बसस्थानकावर कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचारी निंबा शिंदे यांना घटना सांगितली. मात्र महिलेला बॅग धुळे, अमळनेर की अन्य कुठे चोरली गेली हे आठवत नव्हते. शिंदे यांना शंका आली. त्यांनी लागलीच बसस्थानकात फेरफटका मारून चौकशी सुरू केली असता त्यांना दोन, तीन महिला चार, पाच बॅगा घेऊन जात असताना दिसल्या.

शिंदे यांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता सारख्या बॅग असल्याने त्यांनी दोन्ही उचलून घेतल्या होत्या. ओळख पटवण्यासाठी शिंदे यांनी संगीता सोनवणे यांना पोलिस ठाण्यातनेले.

बॅगमध्ये त्यांचे पावणे तीन लाख रुपये ‘जैसे थे’ होते. पोलिस निरीक्षक विजय शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलिस कर्मचारी शरद पाटील यांच्या समक्ष संगीता सोनवणे यांना त्यांचे पावणे तीन लाख रुपये परत करण्यात आले व टॅक्सीमध्ये बसवून सुखरूपपणे चोपडा रवाना करण्यात आले. निंबा शिंदे यांच्या तत्परतेबद्दल कौतुक होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT