ration Card sakal
जळगाव

जळगाव : जिल्ह्यातील तीन हजार केशरी रेशनकार्ड ठरताहेत केवळ शो-पीस

धान्याच्या लाभासाठी वणवण : दुकानदारांकडून ऑनलाइनसाठी फिरवाफिरव

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरासह जिल्ह्यातील सुमारे तीन हजार केशरी कार्डधारकांना बाराअंकी बारकोड नसल्याने त्यांना रेशनवरील धान्याचा लाभ मिळत नाही. त्याच्याकडील रेशनकार्ड शोपीस ठरत आहे. केवळ रहिवासाचा पुरावा म्हणून ही कार्ड वापरात येत आहेत. जिल्हा पुरवठा विभागाने अशा रेशन कार्डावर क्रमांक टाकून कार्डधारकांना धान्य सुरू करावे, अशी मागणी कार्डधारक करीत आहेत.

जिल्ह्यात बहुतांश नागरिक केशरी कार्डधारक आहेत. काही केशरीकार्ड धारकांना त्या कार्डवर स्वस्त धान्याचा लाभ आहे की नाही, याची माहिती नाही. स्वस्त धान्य लाभासाठी पात्रता, अटी बाबतची माहिती कार्डधारकांना नसल्याने केशरी कार्डधारक धान्य लाभापासून वंचित आहेत. कार्ड असूनही धान्य लाभ मिळत नसल्याने केवळ रहिवास पुरावा या कार्डाचा उपयोग हेात आहे. बहुतांश केशरी कार्डधारक नवीन रेशनकार्ड मिळाले म्हणजे लागलीच धान्य मिळेल, या अपेक्षेने परिसरातील रेशन दुकानदारांकडे वारंवार भटकंती करीत आहेत. रेशनकार्ड धारकांचे आधार, रेशनकार्ड झेरॉक्स, संबंधित कागदपत्रे संबंधित तालुका पुरवठा विभागाकडून नियुक्त एजन्सीमार्फत ऑनलाइन अपलोड झाल्याशिवाय केशरी वा एपीएल अंत्योदय लाभार्थ्याला स्वस्त धान्य रेशनचा लाभ मिळणे शक्य नाही. शिधापत्रिकेचा बाराअंकी क्रमांक मिळवून ऑनलाइन प्रक्रियेसाठी संबंधितांकडून वारंवार फिरवाफिरव केली जात असून, तसेच यासंदर्भात असलेली शिधापत्रिकाधारकांची अनभिज्ञता, ऑनलाइनला वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे हजारो रेशनकार्डधारक अजूनही स्वस्त रेशनधान्य लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.

आकडे बोलतात...

  • शुभ्र रेशनकार्डधारक - ७५ हजार ४३४

  • अंत्योदय योजनेचे रेशनकार्ड - एक लाख ३८ हजार

  • प्राधान्य शिधापत्रिका धारक - चार लाख ७७ हजार ६१५

  • केशरी एपीएल कार्डधारक - तीन लाख ४१ हजार

नवीन रेशनकार्ड मिळाले म्हणजे लागलीच धान्य मिळते असे नाही, तर त्यासाठी लाभार्थी यादी नाव असणे व ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. नवीन रेशनकार्डधारकांनी ऑनलाइन नोंदणी करावी.

- सुनील सूर्यवंशी जिल्हा पुरवठा अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT