Farmers holding placards of 'Leaders' village ban'. esakal
जळगाव

Jalgaon News : शेतकऱ्यांनी गावाच्या वेशीवर लावला फलक; केळी पीकविमा रकमेसाठी ’वज्रमूठ’

‘गाव करी ते राव न करी’, अशी म्हण प्रचलित आहे. वारंवार राजकीय नेत्यांकडून सर्वच गोष्टीसंदर्भात आश्वासने दिली जातात.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘गाव करी ते राव न करी’, अशी म्हण प्रचलित आहे. वारंवार राजकीय नेत्यांकडून सर्वच गोष्टीसंदर्भात आश्वासने दिली जातात. परंतु ही आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण होतीलच याची खात्री बऱ्याचदा नसते. राजकीय नेत्यांकडून फक्त आश्वासने मिळतात, पण कामे अपूर्णच राहतात.

येथील व परिसरातील शेतकऱ्यांनी ‘जोपर्यंत मागील वर्षाचा केळी पीकविमा मिळत नाही, तोपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार’ अशा प्रकारचे फलक गावाच्या वेशीवर दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. या फलकाची चर्चा जिल्ह्यात सर्वत्र होऊ लागली आहे.(Thunderbolt for Banana Crop Insurance Amount jalgaon news)

जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, त्यात रावेर तालुक्यात केळीची सर्वाधिक लागवड होत असते. असे असताना प्रधानमंत्री फळपीक विमा योजना मागील वर्ष २०२२-२०२३ मधील नुकसान भरपाईची रक्कम मुदत संपून चार महिने होऊनही अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

प्रत्यक्ष शेतात केळी असताना ती प्रकरणे 'पेंडिंग फॉर अप्रूवल' किंवा 'रिजेक्ट' असे दिसते. विमा काढताना कंपनीच्या अटीप्रमाणे वेळीच टॅगींग फोटो, प्रीमिअम असेच सातबारा उताऱ्यावर त्या खाली केळी असल्याची नोंद आवश्यक असते. तरच विमा निघतो. मग त्या वेळी सर्व कागदपत्रे योग्य असल्यावर आज ती प्रकरणे रद्द कशी झाली? असा खडा सवाल परिसरातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी या बैठकीत केला.

वारंवार अर्ज देऊन, कृषी विभागाकडे तक्रार देऊन, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तसेच सर्व पक्षाच्या नेऱ्यांना भेटूनही न्याय मिळत नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन ‘राजकीय नेत्यांना गावबंदी’ असे टोकाचे पाऊल उचलले आहे.

गावात येणाऱ्या दोन्ही मुख्य मार्गांवर फलक लावण्यात आले असून पीकविम्याची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय पुढारी, नेते, आमदार, खासदार, यांना गावबंदी असून आगामी येणाऱ्या निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्यात आला आहे. निवडणुका जवळ असल्याने काय निर्णय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

तिनशे शेतकरी आले एकत्र

तांदलवाडी फाट्यावर तालुक्यातील सुनोदा, मस्कावद आणि मंगलवाडी येथील सुमारे तिनशे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केळी पीकविमा भरपाई मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत फलक झळकवले व आपला तीव्र संताप व्यक्त केला.

तातडीने भरपाईची रक्कम न मिळाल्यास पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल, असाही निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. अंबर चौधरी, प्रेमानंद महाजन, प्रशांत महाजन यांच्यासह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते.

''केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मागील वर्षी शासनाच्या फळ पीकविमा योजनेत सहभागी होऊ विमा काढला होता. त्या अनुषंगाने विमाधारक शेतकरी सर्व निकषात बसूनही नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास विलंब होत आहे. नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यास सर्व शेतकऱ्यांकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात येईल.''- प्रेमानंद महाजन, केळी उत्पादक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT