valentine day of old people esakal
जळगाव

National Helpline : ज्येष्ठ नागरिकांचा ‘व्हेलेंटाईन डे’ ; राष्ट्रीय हेल्पलाइनचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय (National) हेल्पलाइन १४५६७ च्या माध्यमातून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासनाकडून सदरहू हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. (To create public awareness about national helpline number Valentines Day was celebrated by giving roses to senior citizens jalgaon news)

त्यामधून ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत सदरहू टोल फ्री नंबरवर संपर्क करून त्यांना राहण्यासाठी येणाऱ्या अडचणी, आरोग्याची अडचण सोडविता येते.

मुला मुलींकडून त्यांना संपत्ती मधून बेदखल केले गेले असेल तर त्या साठी विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून विनामूल्य विधी सेवा दिल्या जातात. याबाबतची जनजागृती व्हावी यासाठी ज्येष्ठ नागरिकांना गुलाब फूल देऊन ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा करण्यात आला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून विनामूल्य विधी सेवा दिल्या जातात. कृषीसमृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशन, राजर्षी शाहू महाराज शिक्षण क्रीडा ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसोबत एक नवीन उपक्रम ‘व्हेलेंटाईन डे’ चे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवीन उत्साह, प्रेरणा, आत्मविश्वास, नवीन चेतना निर्माण करणे. त्यांना आपल्या सर्वांसोबत घेऊन चालणे ते आपल्या समाजाचा महत्त्वाचा घटक आहे हा विचार करून हा प्रयत्न केला आहे. यासाठी महेंद्र सोभागे, मीनाक्षी कोळी, सतीश उबाळे, मंगेश उमाळे, कुणाल शुक्ला, इम्रान तळवी यांनी प्रयत्न केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन १४५६७ बाबत माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Raina and Dhawan : मोठी बातमी! सुरेश रैना, शिखर धवनला ‘ED’चा दणका ; तब्बल ११.१४ कोटींची संपत्ती जप्त!

Stock Market Closing : आज शेअर बाजार लाल रंगात बंद! निफ्टी अन् सेन्सेक्स कितीवर? पाहा एका क्लिकमध्ये.

Sanjay Raut: '...हा आमच्या पिढीचा मंत्र होता'! हाताला सलाईन, पण बोटांमध्ये पेन धरलं; रुग्णालयातून संजय राऊतांकडून फोटो शेअर

Latest Marathi Live Update News : पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध बांगलादेशी महिला ताब्यात; मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू....

Margashirsha Month 2025: मार्गशीर्ष महिन्यात चुकूनही करू नका हे काम! वाचा काय करावं आणि काय टाळावं

SCROLL FOR NEXT