robbery esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चित्रा चौकातील ट्रेडर्स दुकान फोडले; जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंगमधील जय लहरी ट्रेडर्स दुकान चोरट्यांनी फोडून दुकानातून ७२ हजार ९०० रुपयांचे साहित्य चोरून नेले. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Traders shop in Chitra Chowk broken into case registered at Zillapeth Police Station Jalgaon Crime News)

शहरातील साने गुरुजी कॉलनीतील रहिवासी हेमंत नंदलाल रंगलानी (वय ५०) यांचे चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंगमध्ये जय लहरी ट्रेडर्स नावाचे शेतीला लागणारे इलेक्ट्रिक मोटारींचे दुकान आहे. दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी (ता. ३१) रात्री आठनंतर त्यांनी दुकान बंद करून घरी गेले.

दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने दुकान बंद होते. सोमवारी (ता. २) सकाळी अकराला त्यांच्या दुकानावर काम करणारा कामगार सुरेश फेगडे यांनी फोन करून दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हेमंत रंगलानी यांनी दुकानावर धाव घेऊन पाहणी केली.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले. हेमंत रंगलाणी यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती शटरचे कुलूप तोडून दोन इलेक्ट्रिक मोटर व इतर सामान, असा एकूण ७२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी हेमंत रंगलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT