pravin mahajan esakal
जळगाव

Jalgaon News : अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांची बदली

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांची सरदार सरोवर प्रकल्पाच्या (नंदुरबार) अप्पर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

त्यांच्या जागी रिक्त होणाऱ्या पदावर बुलडाणा येथून अंकुश पिनाटे यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा प्रशासनाला रविवारी (ता. ४) प्राप्त झाले आहेत. (Transfer of senior Collector Praveen Mahajan jalgaon news)

त्यांची पदोन्नती उपायुक्त महसूलपदावर होण्यास दोन महिन्यांचा कालावधी होता. असे असताना त्यांच्या अचानक बदलीने जिल्हा प्रशासनही चक्रावले आहे.

महाजन यांनी गेल्या जुलैपासून अवैध वाळू उपशाला ९५ टक्के लगाम घातला होता. जूनपासून वाळू उपशास बंदी होती. यामुळे अवेधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्यांना महाजन यांनी चांगलेच जेरीस आणले होते.

९० हजार ब्रास वाळूचा साठा लिलाव

शहरासह जिल्ह्यात ९० हजार ब्रास वाळू माफियांनी विविध ठिकाणी अवैधरीत्या लपवून ठेवली होती. वाळूचे साठे शोधून काढण्यात रात्री बे-रात्री महाजन यांनी हयगय केली नाही.

महसूलचे कर्मचारी, पोलिसांनाही त्यांनी आपण कोठे कारवाई करायला जातो आहोत, हे कळू न देता, कारवाई फत्ते होत असे. शिस्त, नियमांचे पालन करीत त्यांनी मोठा वाळू साठा जप्त करून त्यांचा लिलाव काढला होता. यामुळे वाळू माफियांना चांगलीच चपराक बसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT