police esakal
जळगाव

Jalgaon Police Transfer : जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कर्मचाऱ्यांना विनंती बदल्यांची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Police Transfer : जिल्हा पोलिस दलातील १५ सहाय्यक पोलिस निरीक्षक व १५ उपनिरीक्षक, अशा एकूण ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढलेत.

सोबतच बदली झालेल्या पोलिस उपनिरीक्षकांना नवीन पदाचा पदभार तत्काळ घेण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. (Transfers of police officers in district jalgaon news)

जिल्हा पोलिस दलात सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्यांची प्रतीक्षा होती. महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हास्तरावरील पोलिस आस्थापना मंडळ यांना प्रदान असलेल्या अधिकाराचा वापर करून पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आदेश काढले आहेत.

यात विनंती बदली, नव्याने हजर झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांच्या नवीन नेमणुका, प्रशासकीय बदलीबाबत सर्व बाबींचा विचार करून पोलिस प्रशासनाकडून सोमवारी (ता. २१) रात्री उशिरापर्यंत आदेश काढण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, पोलिस दलातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांचे नुकतेच बदली गॅझेट प्रसिद्ध झाले आहे.

या बदली गॅझेटपूर्वी झालेल्या मुलाखतीत ठरल्याप्रमाणे पोलिस ठाणे न मिळालेले कर्मचारी आणि विविध कारणास्तव विनंती बदल्यांसाठी अर्ज केलेले कर्मचारी, बदल्या होऊनही अधिकाऱ्यांनी न सोडलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड सामन्याची वेळ काय?... जाणून घ्या कधी, कुठे अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री LIVE मॅच...

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

SCROLL FOR NEXT