success story esakal
जळगाव

संघर्षमय प्रवास करत सांगवीचा आदिवासी तरुण बनला डॉक्टर

आदिवासी तरुणाने वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल यश संपादित करून एमबीबीएस पदवी प्राप्त केली.

शंकर भामेरे

पहूर (ता. जामनेर) : 'असाध्य ते साध्य...करिता सायास, कारण अभ्यास..तुका म्हणे' या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे सातत्याने अभ्यास करून आर्थिक परिस्थितीवर मात करत सांगवी (ता . जामनेर) येथील विजय शेरखॉ तडवी या आदिवासी तरुणाने वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल यश संपादित करून एमबीबीएस पदवी प्राप्त केली.

सांगवी येथील शेरखॉ रमजान तडवी आणि बेबाबाई तडवी यांनी अतिशय कष्टातून हातमजुरी करून मुलगा विजयच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. जामनेर येथील ललवाणी विद्यालयातून विजयने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच चाणाक्ष असलेल्या विजयने केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश मिळविले. माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय साकेगाव येथे पूर्ण करून दहावीत ९५ टक्के तर बारावी बोर्ड परीक्षेत ९० टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादित केले. त्यानंतर विजयने नीट (NEET) परीक्षा देऊन पहिल्याच प्रयत्नात एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळविला. नुकतेच त्याने या परीक्षेत प्रथम श्रेणीत उज्ज्वल यश संपादित करून आई -वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले.

बेताची आर्थिक परिस्थिती विजयसाठी नेहमीच प्रेरणास्रोत ठरली. रात्रंदिवस अभ्यास करून विजयने आपले ध्येय साध्य केले. आई-वडिलांच्या कष्टाचे त्याने केलेले चीज तरुणांसाठी प्रेरणादायी असून, त्याने तडवी आदिवासी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. विजयच्या या देदीप्यमान यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

''गोरगरीब रुग्णांची सेवा करून समाज ऋणातून उतराई होण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. माझ्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याचा मनस्वी आनंद वाटतो.'' - डॉ. विजय तडवी, सांगवी, ता. जामनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DULEEP TROPHY FINAL: रजत पाटीदारने कसला भारी कॅच घेतला; संजू सॅमसनच्या भीडूने कमाल केली, संपूर्ण संघ १४९ धावांवर गुंडाळला

Latest Marathi News Updates : भाजप आमदार प्रकाश भाळसाकळे यांचा सरकारवर घरचा आहेर

India US Relations: ट्रम्प मोदी मैत्रीच्या हातमिळवणीने भारतअमेरिका संबंधात नवे सौहार्द निर्माण होण्याची चिन्हे

घराला कुलूप लावून बाहेर जात असतानाच महिलेला भररस्त्यात चाकूने भोसकले; दिरावर खुनाचा आरोप, मंगळवार पेठेत नेमके काय घडले?

किरण मानेची वादग्रस्त पोस्ट व्हायरल; एबीव्हीपीची कारवाईची मागणी, पोस्टमध्ये म्हणाले...'भक्तडुक्कर पिलावळींनो...'

SCROLL FOR NEXT