Jalgaon Crime : नशिराबाद टोल नाक्याजवळ मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ट्रकचा पाठलाग करत दुचाकीस्वारांनी अडविले. (Truck driver robbed at Nashirabad toll booth jalgaon news)
टोल नाका परिसरात ट्रक थांबवून दमदाटी करत चालकाच्या खिशातून २ हजार रोख आणि गुगल-पे ने १९ हजार असे एकूण २१ हजार रुपये हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद पोलिसांत दाखल तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, देवेंद्र कुमार रामद्रश पटेल (वय ३८, रा. छत्रगड, जि.रेवा, मध्यप्रदेश) हा ट्रक चालक असून शनिवारी (ता.२५) देवेंद्र कुमार हा त्याच्या ताब्यातील १४ चाकी ट्रक (क्र. युपी ६३ टी ९७१८) ने जळगावकडून नागपूर येथे जाण्यासाठी निघाला होता.
नशिराबाद टोल नाक्याजवळून जात असताना मागून पाठलाग करत येणाऱ्या दुचाकीस्वारांनी ट्रकचा रस्ता अडविला आणि चालक देवेंद्रकुमार याला ट्रकखाली ओढून त्याला दमदाटी करत खिशातील २ हजारांची रोकड काढली.
तसेच एकाने ट्रकचालकाच्या गुगल पे वरून १९ हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतले. त्यानंतर दोघे पसार झाले. ही घटना घडल्यानंतर ट्रकचालक याने पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार तपास करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.