nima barela and aasaram barela  esakal
जळगाव

Jalgaon News : निंबादेवी धरणात बुडून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वतालगत निंबादेवी धरणात जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या दोघा बालकांचा बुडून मृत्यू झाला.

ही घटना मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. (Two children who went to dam drowned jalgaon news)

नायगाव शिवारातील निमछाव गावठाण भागात रहिवास असलेल्या आदिवासी पाडा वस्तीतील आसाराम शांतिलाल बारेला (वय १५) व निमा किसन बारेला (वय १०) हे दोघे म्हशीला पाणी पाजण्यासाठी निंबादेवी धरणामध्ये उतरले होते.

पाण्याचा अंदाज न आल्याने म्हशीच्या मागोमाग दोघे बालके गेले आणि त्यातच एकाचा पाय घसरला. त्याला धरायला दुसरा गेला असता दुसराही बुडून त्यात मृत झाला. रात्री मुलाचा मृतदेह आढळून आला तर बुधवारी (ता. ३१) सकाळी साडेदहाच्या दरम्यान मुलीचा मृतदेह आदिवासी बांधवांनी काढला.

दरम्यानच्या काळात कोणीही शासकीय अधिकारी वगैरे तिथे फिरकून बघितले नाही, असा आरोप आदिवासी बांधव करीत आहेत. आसाराम हा इयत्ता नववीमध्ये वाघझिरा आश्रमशाळेत शिक्षण घेत होता तर निमा किसन बारेलाही निमच्या गावठाण येथे असलेल्या प्राथमिक शाळेतच चौथीमध्ये शिक्षण घेत होती. दोघांची परिस्थिती गरिबीची आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रकार घडताच आदिवासी बांधवांनी तेथे धाव घेतली आणि मच्छी पकडण्यासाठीचे जाळे धरणात वापरल्याने दोघांचे मृतदेह काढण्यात आले. त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. दोघ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने सर्व आड्यापाड्यातील आदिवासी बांधवांची तिथे गर्दी जमली होती व शोककळा पसरली आहे.

प्रमुख कारण असे की निमछाव या गावठाण भागात गुरांना पाणी पाजण्यासाठी कुंड तयार केलेले आहे. त्या कुंडामध्ये पाणी सोडले जात नसल्याने तिथे जलवाहिनीने खोदण्याचे काम चालू होते. एक दिवसासाठी धरणावर पाणी पाजण्यासाठी दोघं मुलं गेले होते आणि तिथे ही दुर्घटना घडली, असे आदिवासी बांधवांमधून सांगण्यात आले.

याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी संजय देवरे, होमगार्ड जनार्दन महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन विच्छेदनासाठी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्याचे काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SOORYAVANSHI: क्रिकेट सोडा, वैभवचा ‘हा’ व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क! वाघाच्या शोधात जंगलात पोहोचला ‘बेबी बॉस’, पण शेवटी...

Crime: भयंकर! ५ रुपये खर्च केले म्हणून आई संतापली; चिमुकल्याला ३ दिवस घरात कोंडलं, नंतर तळव्यांना दिले चटके

Latest Marathi News Live Update : इराणविरोधातील लष्करी कारवाईवरून अमेरिकेत राजकीय वातावरण तापलं, काँग्रेसचा युद्धविरोधात ठराव

Koyana Dam : कोयनेचे दरवाजे एक फुटावर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Akola News : आ. साजिद खान पठाण यांची काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

SCROLL FOR NEXT