Court Order esakal
जळगाव

Jalgaon Crime News : राणीचे बांबरूड येथील दोघांना 5 वर्षांची शिक्षा; पाचोरा न्यायालयाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : राणीचे बांबरूड (ता. पाचोरा) येथील भाउबंदकीमध्ये शेतातील पाण्याचे कुंड भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादप्रकरणी दाखल गुन्ह्यात पाचोरा न्यायालयाने या गुन्ह्यातील दोन आरोपींना दोन गुन्ह्यात पाच वर्षांची शिक्षा व प्रत्येकी २० हजारप्रमाणे ४० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. (Two from Rani Bambarud sentenced to 5 years Pachora Court Decision Jalgaon Crime News)

शेतातील पाण्याचे कुंड भरण्याच्या कारणावरून २०१८ मध्ये झालेल्या वादात श्रीराम भदाणे यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पाचोरा न्यायालयाने निर्णय दिला असून, दीपक भदाणे व वाल्मीक भदाणे यांना न्या. जी. बी. औंधकर यांनी या गुन्ह्यात दोषी ठरविले असून, कलम ३२६ मध्ये तीन वर्षे सश्रम कारावास, ३३२४ मध्ये दोन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी वीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार हिरामण चौधरी यांनी केला असून, सरकारी अभियोक्ता रमेश माने यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस कर्मचारी दीपक पाटील व कोर्ट केसवाच म्हणून पोलिस कर्मचारी विकास सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT