accident esakal
जळगाव

भीषण अपघात : भरधाव कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू

भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा दुदैवी मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा दुदैवी मृत्यू झाला. हि घटना आज (ता. १६) दुपारी ३ वाजेच्या सुमारास चाळीसगाव- कन्नड रोडवर घडली.

याबाबत वृत्त असे की, नामदेव गोबरू राठोड (वय, ६२) रा. मुंदखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद हे आपल्या दुचाकीने (क्र. एम.एच.२० सीएल १६०४) वैयक्तिक कामानिमित्त चाळीसगावला आले होते. काम आटोपून घरी परत जात असताना अचानक समोरून येणाऱ्या भरधाव कारने (क्र. एम.एच. १७ एझेड ९०१९) त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नामदेव गोबरू राठोड यांच्यासह एका विवाहितेला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचाराकामी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना दोघांची प्राणज्योत मावळली. हि थरारक घटना चाळीसगाव- कन्नड रोडवरील सहयोग हॉटेलसमोर घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सोबतच्या मृत विवाहित महिलेची ओळख सायंकाळी पर्यंत पटलेली नव्हती. तत्पूर्वी राठोड यांची सासरवाडी तालुक्यातील लोणजे येथील आहे. यामुळे सासरच्या मंडळींना भेटण्यासाठी ते आले असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT