Crime  esakal
जळगाव

भावंडांनी सख्या बहिणीलाच फसविले; ATM कार्डद्वारे 5 लाखांच्या रकमेवर डल्ला.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बँकेतून पासबुक भरून आणतो असे सांगत भावांनी बहिणीच्या एटीएमद्वारे परस्पर तिच्या खात्यातून ५ लाखांची रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मेहमूद शमसोद्दीन पिंजारी (वय ५२), अश्पाक शमसोद्दीन पिंजारी (वय ४२, दोघ रा. शिरसोली) या दोघा भावांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (Two siblings cheated their sister by withdrawing 5 lakhs jalgaon latest news)

शिरसोली (ता. जळगाव) येथे शबनम शेख जाकीर पिंजारी कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. त्यांचे पती इंजिनिअर असून ते कामानिमित्त २०१२ पासून सौदी अरेबिया येथे वास्तव्यास होते. दरम्यान, शबनम शेख यासुध्दा पती सोबतच सौदी अरेबिया येथे राहत होत्या. त्या अधून-मधून शिरसोली येथे गावी येत होत्या. गावी आल्यावर पैशांची आवश्यकता भासल्यास एटीएमद्वारे पैसे काढून घेत होत्या. त्यावेळी त्यांचे दोन्ही भाऊ अश्पाक व मेहमूद असे, सोबत यायचे.

अशाच पद्धतीने २४ जुलै २०१७ रोजी शबनम शेख या घराची चावी मोठा भाऊ अश्पाक याला देऊन पुन्हा सौदी अरेबियासाठी निघून गेल्या २५ ऑक्टोंबर २०१७ रोजी शबनम यांच्या पतीने त्यांच्या बँक खात्यात ५ लाख रुपयांचा भरणा केला होता. तो भरणा झाला आहे, की नाही तपासण्यासाठी त्यांनी पत्नीचा भाऊ अश्पाक याला बँकेत जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी अश्पाक याने रक्कम जमा झाल्याचे कळविले होते.

एटीएमद्वारे काढली परस्पर रक्कम

अश्पाक व मेहमूद या दोघ भावांनी आपल्या बहिणीच्या घराच्या कपाटातून एटीएम कार्ड चोरले. त्यानंतर बँकेतील पाच लाख रूपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. २६ सप्टेंबर २०१८ रोजी शबनम या पुन्हा गावी परतल्या.

त्यावेळी त्यांना आपल्या भावांनी परस्पर विनापरवानगी रक्कम काढून घेतल्याचे कळाले. त्यांनी ती रक्कम परत करण्याचे सांगितले. मात्र, त्यांनी रक्कम अद्यापपर्यंत परत केलेली नसून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल आहे. तपास सहाय्यक फौजदार जितेंद्र राठोड करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT